Beed Crime: बीडमध्ये काय चाललंय काय! हॉटेल चालकाला टोळक्याने लाकडी दांडके, बेल्टने बेदम फोडून काढलं, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
beed crime: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Beed Crime News: बीडमधील गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये. बीड-अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला पाच ते सात जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण झालीय. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून अद्याप पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाकडी दांडे आणि बेल्टने ही बेदम मारहाण होताना दिसत आहे. अविनाश साबळे, नितीन साबळे आणि अमोल लोखंडे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण नेमक्या कोणत्या कारणाने झाली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेतून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
नक्की घडलं काय?
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढलं आहे. बीड-अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेलमध्ये रविवारी रात्री उशिरा पाच ते सात जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करत हॉटेल चालकासह इतर दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्लेखोरांनी लाकडी दांडे आणि बेल्टसारख्या वस्तूंचा वापर करत हॉटेल चालक अविनाश साबळे, त्याचा भाऊ नितीन साबळे आणि सहकारी अमोल लोखंडे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. विशेष म्हणजे या गंभीर घटनेनंतरही अद्याप बीड शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही स्थानिकांकडून हॉटेलमधील व्यवहार वा जुन्या वादामुळे हा हल्ला झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याने पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे.
हेही वाचा:





















