एक्स्प्लोर

Beed News : बीडमधील हिंसाचाराची एसआयटी चौकशी व्हावी, धनंजय मुंडेंची मागणी

Beed News : बीडमध्ये झालेल्या जाळपोळीचा मंत्री धनंजय मुंडे यांनी निषेध केला असून एसआयटी चौकशीची मागणी केलीये.

बीड : बीडमधील (Beed) हिंसाचार हे मोठं षडयंत्री असून त्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं. बीडमधील घटनेचा त्यांनी तीव्र निषेध देखील व्यक्त केला. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केलाय. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळापोळ झाली. त्या घटनेनंतर रविवार (6 नोव्हेंबर) रोजी धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्याची पाहणी केली. 

बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध देखील सुरु आहे. या प्रकारनंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आणि  ज्या ज्या ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले होते त्याची पाहणी त्यांनी केली. बीड शहरातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांच्या कार्यालयाला सुद्धा जमावाने आग लावली होती त्याच कार्यालयाची पाहणी धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम केली. 

धनंजय मुंडे काय म्हणाले?

बीड शहराची पाहणी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, बीडमध्ये ज्या पद्धतीने दुर्दैवी घटना घडल्या, तशा कधीच घडल्या नव्हत्या. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. आतापर्यंत कधी कोणाच्या घरापर्यंत पोहचले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तीव्र निषेध केला. जो घटनाक्रम, त्यावरून हे फार मोठे षडयंत्र असल्याचे स्पष्ट आहे. माजलगावात हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस गेल्यानंतर बीड शहरात टार्गेट करुन दगडफेक, जाळपोळ झाली. 

हजार पाचशे लोक पंधरा किलोमीटर जाऊन हॉटेल कसे जाळतात? असा सवाल देखील यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. पोलीस देखील हतबल झाल्याचे चित्र होते. या हिंसाचारातील प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी या करणाची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात  30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीलादेखील आग लावण्यात आली. 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 

हेही वाचा : 

Beed Maratha Protest : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ, आरोपींकडून 11 कोटी वसूल होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणीRavikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Embed widget