Beed Crime News: बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, मिसरुडही न फुटलेल्या टिचभर पोरांच्या टोळक्याने विद्यार्थ्याला घेरुन बेदम मारलं, गुरासारखा हंबरडा फोडला तरी सोडलंच नाही
Beed Crime News: शिरूर तालुक्यातील रायमोह येथे अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण केली.

बीड: बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना (Beed Crime News) सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे. शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्याच टोळक्याकडून बेदम मारहाण (Beed Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बीड जिल्ह्यात मारहाणीच्या (Beed Crime News) घटना सुरूच असून असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील रायमोह येथे अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेट बाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. (Beed Crime News)
बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच; शालेय विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांच्याच टोळक्याकडून बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल#Beednews #Crimenews #Videoviral pic.twitter.com/pWk46aGKgb
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 26, 2025
मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ (Beed Crime News) असून विद्यार्थ्याला मारहाण करण्याचं कारण अद्याप समजू शकलेल नाही. तर याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु जिल्ह्यात सतत मारहाणीच्या (Beed Crime News) घटना समोर येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलीस काय कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.(Beed Crime News)
शाळेच्या गेटबाहेरच विद्यार्थ्यांवर हल्ले होत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असताना पोलिस प्रशासनाची भूमिका किती प्रभावी आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यातील सततच्या मारहाणीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद होत असून नागरिकांकडून कठोर उपाययोजनांची मागणी वाढत आहे.(Beed Crime News)























