(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहा पोलीस ठाण्यात 10 घरफोडीचे गुन्हे, अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून फरार; गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
Beed Police : बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांतच या दरोडेखोराला बेड्या ठोकत अटक केली आहे. सचिन ईश्वर भोसले असे या दरोडेखोराचे नाव आहे.
Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्यासह दरोड टाकणाऱ्या कुख्यात दरोडेखोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या (Police) डोळ्यात मिरची पूड टाकून आणि पोलिसांवर हल्ला करून आरोपी फरार झाला होता. या घटनेनंतर आरोपीला पकडण्याचे पोलिसांवर मोठे आव्हान होते. मात्र, बीड पोलिसांच्या (Beed Police) गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांतच या दरोडेखोराला बेड्या ठोकत अटक केली आहे. सचिन ईश्वर भोसले असे या दरोडेखोराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील नागझरी येथे खुनाच्या गुन्ह्यामध्ये सामील असलेला आरोपी सचिन ईश्वर भोसले याला अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गेले होते. यावेळी आरोपीच्या पत्नीने आणि सासूने पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच, पोलिसांवर दगडफेक केली आणि यामध्ये आरोपी असलेला सचिन ईश्वर भोसले त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी मात्र अतिशय गोपनीय पद्धतीने त्याचा शोध सुरू केला आणि अखेर गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथून सचिन भोसले याला अटक करण्यात आली आहे.
सहा पोलीस ठाण्यामध्ये दहा ठिकाणी घरफोडीचे गुन्हे
सचिन भोसले हा अट्टल दरोडेखोर असून सहा पोलीस ठाण्यामध्ये दहा ठिकाणी घरफोडी केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सुरुवातीला बंद असलेल्या घराची रेकी करून रात्री त्या घरावर दरोडा टाकला जातो. लोखंडी रॉड कटावळीच्या साह्याने कुलूप आणि घराचे दरवाजे तोडून सचिन भोसले याची भोसले गॅंग सराईतपणे दरोडा टाकते. दरोडा टाकताना जर कोणी प्रतिकार केला तर अनेकवेळा त्यांनी जीव घेणे हल्ले देखील घरमालकांवर केले आहेत.
साथीदारांचा देखील शोध घेतला जात आहे.
चार दिवसापूर्वी आष्टी तालुक्यामध्ये एका तरुणाचा खून झाला होता आणि याच खुणामध्ये सामील असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस हे नागझरी गावात गेले होते. यावेळी पोलिसांवरच हल्ला करून सचिन भोसले प्रसार झाला होता. यापूर्वी देखील कर्जत, पाथर्डी, गेवराई, आष्टी, सांगोला, मालेगाव या ठिकाणी त्याने घरफोड्या केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला आता अटक केली असून, त्याच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दोन दिवसांत बेड्या ठोकल्या...
खुनाच्या गुन्ह्यात असेलल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करून, त्यांच्या डोळ्यात मिरीची पूड टाकण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यामुळे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक निर्माण करण्यात आले होते. तसेच सर्वत्र या आरोपीचा शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे अवघ्या दोनच दिवसांत त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथून अटक केली आहे. तसेच, त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :