बीड : बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता
बीड : मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या पावसानंतर बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
बीड : मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या पावसानंतर बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. यामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बीड नगरपालिकेने बिंदुसरा नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बीड नगरपरिषद हद्दीतील बिंदुसरा नदीचे पूर नियंत्रण रेषेत आहे. बिंदुसरा धरण हे पूर्णपणे भरलेला असून ओसंडून वाहत आहे व अतिवृष्टी कोणत्याही क्षणी नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. त्यामुळे महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पूर रेषेतनियंत्रण रेषेत राहणाऱ्या सर्व नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन
मुख्याधिकारी नगरपरिषद व तहसीलदार बीड यांनी केले आहे.
रीप हंगामातील पिके मात्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही
या दोन दिवसात संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील लहान मोठे असे जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहत आहेत; जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याचा आनंद असला तरी खरीप हंगामातील पिके मात्र धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा अधिक पाऊस झाला असून काही ठिकाणी अजूनही पाऊस पडतो आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशास अनुसरून पावसाचा जोर कमी होताच जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करावेत व नियमाप्रमाणे मदतीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सतर्क राहून आपल्या खरीप पिकांचे झालेले नुकसान विमा कंपनीस तातडीने निर्धारित वेळेत कळवावे; जेणेकरून आपल्या पिकांना विम्याचेही संरक्षण मिळेल. जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास काही नद्या व जलाशय धोक्याची पातळी ओलांडू शकतात, त्यामुळे जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. पुराचा धोका उद्भवू शकणाऱ्या नद्यांच्या नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या