Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. पुण्यातील मध्यभागात गोळीबाराचा थरार पाहायला मिळालाय.
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पुण्यातील मध्यभागात गोळीबाराचा थरार पाहायला मिळालाय. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, गोळीबार केल्यानंतर आरोपी फारार झाले आहेत. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या गोळीबारात आंदेकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम, अशी संशयित आरोपींनी नावे आहेत.
टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली
पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काय सुरु आहे, असा प्रश्न निर्माण झालाय. एका टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर केल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्लाही करण्यात आलाय. ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जे लोक आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते, ते लगेच फरार झाले आहेत. दरम्यान, फायरिंग झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली आहे. हॉस्पीटलच्या बाहेर देखील त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती कोठे राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पुण्यात आता माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आलाय.
घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंबेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते
अधिकची माहिती अशी की, एका टू व्हीलरवरुन दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली आहे. गोळीबार करून कोयत्याने वार देखील करण्यात आले आहेत. दरम्यान हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आपल्यामध्ये एकजूट असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केलाय. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंबेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने के लिए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक होते. शिवाय त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे बोलले जाते. मात्र घरगुती वादातून नातेवाईकाने हल्ला केल्याची माहिती आहे. दरम्यान, माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या