Beed Crime : बीडमध्ये हालचालींना वेग, वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं, धनंजय देशमुख कळंब पोलिसांना भेटणार
Beed Crime News : बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर बीड पोलिसांनी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

बीड : वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा ठपका ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड (Beed Crime News) कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं होतं. या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हालचालींना वेग आला असून पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहे. अशातच बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर बीड पोलिसांनी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.
वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं
बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे समोर आलं होतं. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. दरम्यान, आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले.
केज पोलिसांनी कळंबच्या 'त्या' महिलेची साधी चौकशी केली नाही
मस्साजोग येथे काल (31 मार्च) मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही. यावर्षी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता. परिणामी, काल मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले. मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता. त्यांनी माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला. केज पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणे करण्याचा प्रयत्न केला नाही. केज पोलिसांनी कळंबच्या महिलेची चौकशी देखील केली नाही. त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे. विशेष करून पीआय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरले.
प्रशासनाच्या गोंधळाबाबत अजित पवारांना भेटणार- धनंजय देशमुख
होळीच्या दिवशी कर्मचारी उत्साहात होळी साजरा करत होते. याचा आता तरी तपास झाला पाहिजे. तपासाची अपेक्षा यंत्रणांकडून आम्हाला आहे. कृष्णा आंधळे बाबत मी एस पी साहेबांना फोन केला होता, तो का जेरबंद होत नाही? हा प्रश्न त्यांचा आहे. सयाजी शिंदे भेटायला येणार आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत जो काही गोंधळ चालू आहे त्याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्या भेट घेणार आहोत. आरोपीमध्ये असतानाच या गोष्टी कशा बाहेर येतात. जेल प्रशासनाकडून आम्ही मागितलेली कुठलीच माहिती आम्हाला मिळालेली नाही. बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाची समन्वयक समिती उद्या अजित पवारांना भेटणार आहे. अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
हे ही वाचा























