एक्स्प्लोर

Bacchu Kadu Farmer Protest : बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प, सामान्य नागरिकांची कोंडी, महिला चिडून म्हणाली, 'एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता?

बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. अशातच एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता? असा थेट सवाल करत अडचणीत अडकलेल्या महिलांनी बच्चू कडू यांना थेट प्रश्न केला आहे.

Bacchu Kadu Farmer Protest :  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर - वर्धा आणि जबलपूर - हैदराबाद महामार्गास इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी गेल्या 15 तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. अशातच एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता? असा थेट सवाल करत अडचणीत अडकलेल्या महिलांनी बच्चू कडू यांना थेट प्रश्न केला आहे.

Bacchu Kadu Farmer Protest : वाहतूक कोंडीमुळे तब्बल 14 ते 15 तास सामान्य नागरिक अडकलेले; अनेकांची पायपीट

नागपुरात बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनामुळे आउटर रिंग रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 14 ते 15 तास अडकलेले अनेक कुटुंब आणि सामान्य नागरिक आता पायीच महामार्गावर पुढच्या दिशेने निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक महिलांनी संपूर्ण रात्र महामार्गावर एसटी बस किंवा खाजगी वाहनांमध्येच काढली आहे. सकाळी मात्र हातात सोबतचे जड साहित्य आणि लेकरांना घेऊन महिलांचे ग्रुप्स आऊटर रिंग रोडवर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्या दिशेने पायी निघालेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अनेक महिलांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात तीव्र रोष व्यक्त करत एका कष्टकऱ्यासाठी बच्चू कडू तुम्ही आंदोलन करत आहात, मात्र दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत आणत आहात, असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले आहे.

Nagpur Farmer Protest : महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सर्वसामान्यांचे हाल

बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर - वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही. तर एका बाजूला नागपूर - अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर - रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.

विविध उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन जाणार ट्रक, बाजारपेठांमध्ये भाजीपाला घेऊन जाणारे वाहन आणि नागपुरात काही कामानिमित्ताने खाजगी वाहनातून आलेले सामान्य नागरिक सर्वच आऊटर रिंग रोडवर अनेक किलोमीटरच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडले आहे. काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास आउटर रिंग रोडवरची वाहतूक आंदोलकांनी थांबवली होती, तेव्हापासून कित्येक तास जेवण पाणी शिवाय सामान्य नागरिक आणि ट्रकचालक अडकून पडले आहे. ज्यांच्या मोबाईलला रेंज आहे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत आहे. अन्यथा अनेकांचे स्वकीयांशी संपर्क सुद्धा होत नाही आहे.

बायपास सर्जरीनंतर वडिलांना भेटायला गेल्या, लेकरांसह रुग्णालयात 14 तास अडकून पडल्या

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेची प्रचंड कोंडी केल्याचे चित्र आहे. नागपुरातील भक्ती देशपांडे त्यांच्या वडिलांची शुअररटेक हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी काल दुपारी सुमारास शुअरटेक हॉस्पिटलला पोहोल्या होत्या. मात्र हॉस्पिटलच्या समोर वर्धा महामार्गावर संध्याकाळी चक्काजाम आंदोलन सुरू झाल, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि देशपांडे कुटुंबातील तीन महिला लहान लेकरांसह रुग्णालयात 14 तास अडकून पडल्या. आज सकाळी कुठलीच सोय नसल्यामुळे आणि वाहतूक पुन्हा सुरू न झाल्यामुळे अखेरीस या महिलांनी पायीच प्रवास सुरू केले असून 2 किलोमीटरचा पायी प्रवास करून या सर्व महिला आधी आऊटर रिंग रोडवर पोहोचल्या आणि त्यानंतर पुढे हुडकेश्वरच्या दिशेने पायी निघाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, मात्र आंदोलनामुळे आमची अडचण का? असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे.

बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या:

1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
2) कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
5) नागपुर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Election: राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, सामंतांचा हल्लाबोल
Maha Politics: 'युतीतच लढू', नारायण राणेंचा शब्द; वडील-मुलामध्ये मतभेद, नितेश राणेंचा स्वबळाचा नारा
Mahayuti Election : 'आगामी निवडणुका स्वबळावर लढू', Ajit Pawar यांचे संकेत; महायुतीत मतभेद?
Matoshree Drone Row: 'कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते?', Aaditya Thackeray यांचा सवाल
Adventure Tourism: 'भूदरगड आता देशाच्या पर्यटन नकाशावर येईल', पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget