एक्स्प्लोर

चक्काजाम आंदोलनात भाजप आमदार अडकला; सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यातून लपून जात असताना प्रहार कार्यकर्त्यांनी अलगद पकडलं, थेट बच्चू कडूंपुढं बसवलं

Farmer Protest : शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केला असता या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदार संघाचे भाजप आमदार राजू बकाने (Raju Bakane) हे त्यांच्या वाहनात अडकले होते.

Bacchu Kadu Farmer Protest : शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे. अशातच भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी (Farmer Protest) आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा महामार्ग बंद केला असता या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदार संघाचे भाजप आमदार राजू बकाने (Raju Bakane) हे त्यांच्या वाहनात अडकले होते. मात्र, त्यानंतर आमदार बकाने हे त्यांच्या वाहनाला तिथेच सोडून सुरक्षारक्षकाच्या घेऱ्यात आंदोलनकर्त्यांपासून नजर चुकवून लपत जाण्याचा प्रयत्न करीत होते.

यावेळी काही आंदोलकांच्या निदर्शनात आमदार बकाने पडले आणि त्यांनी आमदार बकाने यांना तिथेच अडवून धरलं. त्यानंतर प्रहारच्या या आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार बकाने यांना बच्चू कडू सोबत आंदोलनस्थळी नेत बसविले. दरम्यान, चार तासांपासून भाजप आमदार बकाने हे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात आंदोलनस्थळी होते. यावेळी आमदार बकाने यांनी, आंदोलनकर्त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि येत्या अधिवेशनात हा मुद्दा मी लावून धरेल असे आश्वासन दिलं आहे.

Nagpur Farmer Agitation: 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम, त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा

नागपूरमध्ये (Nagpur) बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) भव्य मोर्चा काढला. अद्याप बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच असून अजूनही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. कालची (28) रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात सरकार नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नागपूरच्या वेशीवर हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि बच्चू कडू करत आहेत. 'जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली आहे. समृद्धी महामार्गासह जबलपूर, भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत.

शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्या आहेत. सरकारने बैठकीचे निमंत्रण देऊनही शेतकरी नेते उपस्थित राहिले नाहीत, असा दावा सरकारतर्फे केला जात आहे, तर दुसरीकडे ऐनवेळी निमंत्रण आल्याने पोहोचणे शक्य नव्हते, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. हे जाती-धर्माचे नाही, तर मातीचे आंदोलन असल्याने सरकारने स्वतः चर्चेसाठी पुढे यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत हातमिळवणी; फोटो शेअर करत दानवेंची टीका, शिंदेसेनेचाही पलटवार
Dhananjay Munde: आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
आपदा में अवसर! इकडं माणिकराव संकटात अन् तिकडं शांतीत क्रांती करत धनुभाऊंची थेट दिल्लीत 'मन की बात'; योगायोग की नियोजित घरवापसी?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Video: मेस्सीने भारत भेटीचा व्हिडिओ शेअर केला, पण राजकारण्यांना किक मारली, केवळ तीन सेलिब्रेटींना फ्रेममध्ये संधी दिली ते कोण?
Satej Patil: जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
जास्तच नाराज झालेल्यांना विधानसभेला उमेदवारी देतो, पण मनपाला उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका; सतेज पाटील काय काय म्हणाले?
Dhananjay Munde: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
मोठी बातमी : धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची शक्यता, कोकाटे आऊट झाल्यास धनूभाऊंची एन्ट्री होणार?
Eknath Shinde Drugs: एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Embed widget