(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ही इलेक्ट्रिक कार ठरणार गेम चेंजर? नवीन BMW i4 भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये गाठणार 590KM चा पल्ला
BMW i4 electric car launch: प्रीमियम आणि लक्झरी कार निर्माता BMW (BMW) ने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक कार BMW i4 Electric (BMW i4) भारतात लॉन्च केली आहे.
BMW i4 electric car launch: प्रीमियम आणि लक्झरी कार निर्माता BMW (BMW) ने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक कार BMW i4 Electric (BMW i4) भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 69.90 लाख रुपये इतकी ठेवली आहे. सेडान सेगमेंटमधील ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 590 किमी किमीपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, देशातील ही पहिली मध्यम आकाराची सेडान आहे, जी पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे.
बुकिंग सुरू
कंपनीने या मध्यम आकाराच्या सेदान कारची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या कारची प्री-बुकिंग करू शकता. कंपनी जुलै 2022 मध्ये BMW i4 ची डिलिव्हरी सुरू करेल. कंपनीने गेल्या 180 दिवसांत ही तिसरी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केली आहे.
कारची मोटर आहे दमदार
BMW i4 इलेक्ट्रिक कारची मोटर 340ps ची पॉवर आणि 430Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारची टॉप स्पीड 190 किमी प्रतितास आहे.
कारमध्ये मिळणार हे खास फीचर्स
- BMW i4 मध्ये स्टीयरिंग व्हीलच्या मागे 12.3-इंचाचा डिजिटल माहिती डिस्प्ले मिळतो.
- कारच्या डॅशबोर्डमध्ये नेव्हिगेशनसह 14.9-इंचाचा कंट्रोल डिस्प्ले आहे.
- कारमध्ये 5व्या पिढीतील बीएमडब्ल्यू ई-ड्राइव्ह तंत्रज्ञान आहे.
- कंपनीने ही कार सिंगल eDrive 40 प्रकारात सादर केली आहे.
- मिनरल व्हाइट मेटॅलिक, स्कायस्क्रॅपर ग्रे मेटॅलिक आणि ब्लॅक या तीन रंग पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
चार्जिंग
ही कार 80.7 kW क्षमतेच्या बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 590 किमीपर्यंत धावू शकते. ही रेंज भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या रेंजपेक्षा जास्त आहे. ग्राहकाला कारसोबत 205kw DC फास्ट चार्जर मिळेल. कारची बॅटरी केवळ 31 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होते. BMW 11kw वॉल बॉक्स AC चार्जर ऑफर करत आहे, जे ही कार 8 तासात शून्य ते 100% चार्ज करते. नवीन इलेक्ट्रिक कार BMW i4 मध्ये 360 डिग्री कॅमेरा, 3-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, पॉवर फ्रंट सीट, एलईडी हेडलॅम्प आणि इतर अनेक कनेक्टेड फीचर्स आहेत.