Upcoming New Cars : भारतात लवकरच कारचा बंपर धमाका; लॉन्च होणार 'या' 8 नवीन कार; पाहा संपूर्ण लिस्ट
New Car Arriving : Citroën पुढील महिन्यात आपली नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक EC3 लॉन्च करणार आहे. या कारमध्ये 29.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध असेल.
New Car Arriving : भारतात कारची मागणी झपाट्याने वाढतेय. अनेक वाहनांवर तर अॅडव्हान्स बुकिंग सुरु आहे. हाच विचार करुन अनेक कार निर्माता कंपन्या यावर्षी अनेक नवीन कारची लॉन्चिंग करण्याच्या तयारीत आहेत. भारतात येत्या 3 ते 4 महिन्यात तब्बल 8 नवीन कार बाजारात लॉन्च होणार आहेत. यामध्ये पेट्रोल कार बरोबरच इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे.
मारुती सुझुकी फ्रॉंक्स (Maruti Suzuki Fronx) :
मारुती सुझुकी लवकरच आपली Baleno आधारित Fronx SUV बाजारात आणणार आहे. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिसेल. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह आणली जाईल. त्याची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत सुमारे 7 लाख रुपये असू शकते. ही कार एप्रिलमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी जिम्नी 5 डोअर (Maruti Suzuki Jimny 5 Door) :
मारुती सुझुकी जिम्नी 5 डोअर ही लाईफस्टाईलची एसयूव्ही आहे. या कारमध्ये 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन दिले जाईल. या कारचं लॉन्चिंग एप्रिल किंवा मे मध्ये केलं जाऊ शकते. या ऑफ रोड SUV ला Suzuki ची AllGrip Pro 4WD सिस्टीम मिळेल. त्याची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते.
नवीन जनरेशन ह्युंदाई वेर्ना (New Generation Hyundai Verna)
Hyundai Motor पुढील महिन्यात नवीन नेक्स्ट जनरेशन Verna लाँच करु शकते. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डीआय पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळू शकतो. या कारमध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. या कारसाठी बुकिंग सुरु झाले आहे.
होंडा सिटी फेसलिफ्ट (Honda City Facelift) :
Honda 2 मार्च रोजी आपली मिडसाईज सेडान कार Honda City फेसलिफ्टेड व्हर्जनमध्ये लॉन्च करणार आहे. या कारमध्ये काही बदलांसह अनेक फीचर्स अपडेट्स पाहायला मिळतात. त्याची सुरुवातीची एक्स-शोरुम सुमारे 13 लाख रुपये असू शकते.
टाटा हॅरियर फेसलिफ्ट (Tata Harrier Facelift) :
टाटा मोटर्स लवकरच आपली हॅरियर आणि सफारी डार्क रेड एडिशनमध्ये लॉन्च करणार आहे. या कारचे बुकिंगही सुरु झाले आहे. ADAS, 360-डिग्री कॅमेरा, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह इतर अनेक वैशिष्ट्ये देखील यामध्ये दिसू शकतात. या दोन्ही कार एप्रिलमध्ये लॉन्च होऊ शकतात.
BYD सील (BYD Seal) :
BYD आपली नवीन इलेक्ट्रिक सेडान कार सील एप्रिल किंवा मे मध्ये लॉन्च करु शकते. या कारमध्ये ब्लेड बॅटरी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. नवीन सीलमध्ये 82.5 kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, ज्यामुळे ही कार 700 किमी पर्यंतची रेंज मिळवू शकते.
सिट्रोन eC3 (Citroën eC3) :
Citroën पुढील महिन्यात आपली नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक EC3 लॉन्च करणार आहे. या कारमध्ये 29.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध असेल. या कारला प्रति चार्ज 320 किमीची रेंज मिळेल. ही कार पेट्रोल C3 वर आधारित आहे.
महत्त्वाच्या बातम्या :