Toyota Car Recall: टोयोटाने आपली अर्बन क्रूझर हायरायडर कार केली रिकॉल, जाणून घ्या काय आहे कारण
Car Recalling Reason : वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने अलीकडेच आपली बहुचर्चित टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन (toyota urban cruiser hyryder engine) कार लॉन्च केली होती. मात्र आता या कारमध्ये दोष आढळून आल्याची बातमी समोर येत आहे.
![Toyota Car Recall: टोयोटाने आपली अर्बन क्रूझर हायरायडर कार केली रिकॉल, जाणून घ्या काय आहे कारण Toyota Urban Cruiser Hyryder Recall Find out what is the reason hyryder price marathi auto news Toyota Car Recall: टोयोटाने आपली अर्बन क्रूझर हायरायडर कार केली रिकॉल, जाणून घ्या काय आहे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/07/fcc04ec89c34c5633f292455735fcbf81670411066446384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Car Recalling Reason : वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने अलीकडेच आपली बहुचर्चित टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन कार लॉन्च केली होती. मात्र आता या कारमध्ये दोष आढळून आल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने हायराईडरच्या 994 युनिट्स परत मागवत आहे. या गाड्या परत मागवण्याचे कारण कारच्या सीट बेल्टमधील काही दोष असल्याचे सांगण्यात आले आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर रिकॉल (Toyota Urban Cruiser Hyryder Recall)
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyryder) कारच्या फ्रंट सीट बेल्ट शोल्डर हाईट अॅडजस्टरच्या चाइल्ड पार्ट्समध्ये दोष असल्याचा संशय आहे. या दोषामुळे कारचा सीट बेल्ट तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने 9 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान तयार केलेल्या गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी कंपनीकडे अद्याप याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. तरीही कंपनी लवकरच त्या कार मालकांशी संपर्क साधून कोणाला अशी समस्या आली आहे का, हे जाणून घेत आहे. तसेच कोणतीही समस्या आढळल्यास कंपनी तो भाग बदलून देईल, असं सांगण्यात येत आहे.
हायरायडर इंजिन (toyota urban cruiser hyryder engine)
टोयोटाने आपल्या या कारमध्ये 1.5-L इंजिन दिले आहे. जे ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह सादर केले गेले आहे. या कारचे इंजिन 68 kW चे आउटपुट देते. जे 122 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच यात बसवलेली मोटर 59 kW पॉवर आउटपुट आणि 141 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे आणि दोन्ही मोटर्स मिळून 85 kW आउटपुट तयार करण्यास सक्षम आहेत.
दरम्यान, कार रिकॉल ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्या वाहन उत्पादक कंपनीला त्यांच्या कोणत्याही वाहनाच्या विशिष्ट भागामध्ये बिघाड झाल्याचा संशय येतो किंवा त्याच गोष्टीच्या वारंवार तक्रारी येत असतात, तेव्हा कंपनी आपले वाहन परत मागवते. यासोबतच परत मागवलेल्या वाहनात आढळून आलेले दोष दूर करण्यासाठी कंपनी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेत नाही.
इतर महत्वाची बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)