(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Electric Car : Tata Tiago EV ची डिलिव्हरी झाली सुरू; Citroen eC3 ला देणार जबरदस्त टक्कर
Tata Electric Car : Tata Tiago EV ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख ते 11.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Tata Electric Car : दिग्गज कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) गेल्या वर्षी आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार टियागोचं इलेक्ट्रिक व्हर्जन (Tata Tiago EV) लॉन्च केलं. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुरुवातीलाच या कारसाठी 20,000 हून अधिक बुकिंग झाले आहेत. कंपनीने 3 फेब्रुवारी 2023 (काल) पासून ही कार ग्राहकांना देणं सुरु केलं आहे.
इतकं बुकिंग झालं
Tata ने गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरपासून नवीन Tiago EV साठी बुकिंग सुरू केलं होतं आणि पहिल्याच दिवशी जवळपास 10,000 कारचं बुकिंग झालं होतं. टाटाने सुरुवातीला 10 हजार ग्राहकांसाठीच बुकिंग सुरू ठेवलं होतं. मात्र, वाढत्या मागणीमुळे या कारची बुकिंग 20,000 ग्राहकांपर्यंत करण्यात आली. टाटा मोटर्सने यापूर्वीच कारच्या 2,000 युनिट्सची डिलिव्हरी केली आहे.
Tata Tiago EV ची बॅटरी आणि रेंज कशी आहे?
Tata Tiago EV मध्ये पॉवर देण्यासाठी, 19.2 kWh आणि 24 kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे, जे अनुक्रमे 60 bhp आणि 74 bhp पॉवर जनरेट करतात. हे बॅटरी पॅक प्रति चार्ज अनुक्रमे 250 किमी आणि 315 किमीची रेंज देतात. त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 8.7 तास लागतात. परंतु, फास्ट चार्जरने ती फक्त एका तासांत चार्ज केली जाऊ शकते.
Tata Tiago EV ची किंमत किती आहे?
Tata Tiago EV ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख ते 11.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार बाजारात आगामी Citroën EC3 शी स्पर्धा करेल, ज्याची रेंज प्रति चार्ज 350 किलोमीटर असल्याचा दावा केला जातो.
Citroen eC3 ला देणार जबरदस्त टक्कर
Citroen eC3 ला एकच इलेक्ट्रिक मोटर मिळते, जी 57 hp पॉवर आणि 143 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही इलेक्ट्रिक कार फक्त 6.8 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि या कारच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे तर ती 107 किमी प्रतितास आहे. यात 29.2 kWh चा बॅटरी पॅक दिसेल, ज्यामध्ये मानक 3.3 kW ऑन-बोर्ड AC चार्जर दिलेला आहे आणि 10-100 टक्के चार्ज होण्यासाठी 10.5 तास लागतात. तसेच, 57 मिनिटांत डीसी चार्जरने 10 ते 80 टक्के चार्ज करता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :