Tata Tiago आणि Tigor सीएनजी लॉन्च; प्री-बुकिंग सुरू
देशातील आघाडीची कार निर्माता असलेल्या टाटा मोटर्स कंपनीची ही पहिली सीएनजी वाहने असतील. टाटा मोटर्सकडून टियागो आणि टिगोरच्या सीएनची प्रकारांची चाचणी करण्यात येत होती.
मुंबई : टाटा मोटर्सच्या Tata Tiago आणि Tigor मॉडेलच्या सीएनजीच्या गाड्या पुढच्या महिन्यात बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी या सीएनजी कार्स नोव्हेंबर 2021 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा होती, परंतु आता ती अधिकृतपणे जानेवारी 2022 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय टाटा मोटर्सच्या निवडक डीलरशिप्सनी यासाठी आधीच अनधिकृत बुकिंग सुरू केले आहे.
देशातील आघाडीची कार निर्माता असलेल्या टाटा मोटर्स कंपनीची ही पहिली सीएनजी वाहने असतील. टाटा मोटर्सकडून टियागो आणि टिगोरच्या सीएनची प्रकारांची चाचणी करण्यात येत होती. कंपनीने अद्याप या सीएनजी कारच्या लॉन्चिंग टाइमलाइन बद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, दिल्ली-एनसीआर विभागातील आमच्या डीलरशिप सूत्रांनुसार, नवीन टियागो सीएनजी आणि टिगोर सीएनजी पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात.
अवघ्या 11,000 ते 15,000 रुपये बुकिंग?
टाटा मोटर्सच्या निवडक डीलरशिपवर यासाठी आधीच बुकिंग सुरू झालं आहे. डिलरशिप असणाऱ्यांकडे तुम्ही टियागो सीएनजी आणि टिगोर सीएनजीचे 11,000 ते रु. 15,000 रुपये रिफंडेबल टोकन रक्कम देऊन प्री-बुक करु शकणार आहात. सध्या, टियागो आणि टिगोरला 1.2-लीटर, तीन-सिलेंडर, नैसर्गिकरित्या-अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल. ही मोटर 84.8 hp ची पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन मानक म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला पर्यायी 5-स्पीड एएमटीदेखील मिळते.
टियागो सीएनजी आणि टिगोर सीएनजीच्या आगामी सीएनजी प्रकारांना 1.2-लीटर पेट्रोल मोटरची
डी-ट्यून आवृत्ती मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, इंजिन केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाईल. नवीन Tata Tiago CNG ची स्पर्धा Hyundai Santro CNG, Maruti Suzuki WagonR S-CNG इत्यादींशी होईल, तर Tigor CNG ची Hyundai Aura CNG शी स्पर्धा होईल.