(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Nexon Dark Edition : Tata Motors आणणार Nexon चं डार्क एडिशन; जाणून घ्या काय असेल खासियत?
Tata Nexon Dark Edition : डार्क एडिशन मॉडेल्स या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहेत, ब्रेझा, किगर आणि मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सना आधीच ब्लॅक एडिशन मिळाले आहे.
Tata Nexon Dark Edition : Tata च्या SUV कार या आपल्या डार्क एडिशनसाठी बाजारात फार लोकप्रिय झाल्या आहेत. या कारचा हिस्सा नेक्सॉन (Nexon), हॅरियर आणि सफारी सारख्या मॉडेल्सच्या विक्रीत 15-40 टक्के आहे. हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट लाँचच्या वेळी डार्क एडिशन व्हेरियंटसह आले होते. पण, नवीन नेक्सॉनसाठी हे व्हर्जन उपलब्ध नव्हतं. आता काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स नेक्सॉन डार्क एडिशन (Tata Nexon Dark Edition) मार्चच्या सुरुवातीला सादर करणार असं सांगण्यत आलं आहे. हे व्हर्जन कोणत्या ट्रिमसाठी उपलब्ध असेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयत.
टाटा नेक्सॉन डार्क एडिशन व्हेरिएंट (Tata Nexon Dark Edition Varient)
डार्क एडिशन ट्रीटमेंट नेक्सॉन आणि त्यावरील मिड-स्पेक ट्रिम्सवर उपलब्ध आहे. क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+, क्रिएटिव्ह+ एस, फियरलेस, फियरलेस एस आणि फियरलेस+ एस मध्ये दिले जाईल. हे ट्रिम 120hp, 1.2-लीटर टर्बो पेट्रोल किंवा 115hp, 1.5-लीटर डिझेलच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-AMT किंवा 6-DCT गिअरबॉक्स आणि 6-स्पीड MT किंवा AMT चे पर्याय आहेत.
टाटा नेक्सॉन डार्क एडिशन एक्सटीरियर आणि इंटिरियर
नुकत्याच झालेल्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये कंपनीने Nexon EV ची डार्क एडिशन सादर केली होती. जर ते बाजारात आले, तर नेक्सॉन डार्कला ब्लॅक बंपर आणि ग्रिल, डार्क रेल आणि मिश्र धातूंसह पूर्णपणे ब्लॅक-आउट एक्सटीरियर फिनिश मिळेल. त्याची व्हिल्स आणि टाटा लोगो देखील ब्लॅक असेल. आतील बाजूस, ब्लॅक-आउट डॅशबोर्ड, ग्लॉस ब्लॅक सेंटर कन्सोल, ब्लॅक लेथरेट अपहोल्स्ट्री आणि ब्लॅक रूफ लाइनर मिळण्याची अपेक्षा आहे. बाकीचे फीचर्स आणि इंटीरियर कसे असेल या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नेक्सॉन डार्कमध्ये एलईडी डेटाईम रनिंग लाईट्स, टेल-लाईट्स, कीलेस गो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि इतर अनेक वैशिष्ट्ये मिळतील.
पॉप्युलर आहे डार्क एडिशन
डार्क एडिशन मॉडेल्स या सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहेत, ब्रेझा, किगर आणि मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सना आधीच ब्लॅक एडिशन मिळाले आहे, तर सोनटच्या एक्स-लाईन व्हेरियंटला अनोखे मॅट ग्रे फिनिश मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :