Ford च्या प्लांटवर 'TATA'चा कब्जा, नवीन वर्षात मिळणार मोठं यश
Tata Motors Ford India Sanand Plant Takeover Closing Date: टाटा मोटर्सने (Tata Motors) या वर्षी ऑगस्टमध्ये फोर्डचा साणंद प्लांट (Ford Motors) अधिग्रहित केला आहे.
Tata Motors Ford India Sanand Plant Takeover Closing Date: टाटा मोटर्सने (Tata Motors) या वर्षी ऑगस्टमध्ये फोर्डचा साणंद प्लांट (Ford Motors) अधिग्रहित केला आहे. आता कंपनीने घोषित केले आहे की, 10 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यासाठी फोर्ड इंडियाशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेइकल युनिट Tata Passenger Electric Mobility ने (TPEML) 725.7 कोटी रुपयांना गुजरातमधील साणंद येथे फोर्ड मोटर्सचा उत्पादन कारखाना विकत घेतला होता.
टाटा मोटर्स आणि फोर्ड (Ford Motors) यांच्यातील करारानुसार, टाटा मोटर्स (Tata Motors) प्लांटच्या परिसरात असलेली सर्व घरे, यंत्रसामग्री आणि उपकरणांसह संपूर्ण वाहन निर्मिती प्रकल्प ताब्यात घेईल. याशिवाय फोर्डच्या प्लांटमध्ये (Ford Sanand plant ) काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचीही कंपनी नियुक्ती करणार आहे. टाटा मोटर्सने जाहीर केले आहे की, फोर्ड प्लांटच्या अधिग्रहणामुळे कंपनीला वर्षाला अतिरिक्त 3,00,000 वाहने तयार करू शकतील आणि गरज भासल्यास ते 4,20,000 युनिट्सपर्यंत वाढवता येईल.
तत्पूर्वी फोर्डने (Ford Motors) भारतात आपल्या कारचे उत्पादन बंद केले आहे. गेल्या दशकापासून सातत्याने तोट्यात असल्याने कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. फोर्डचे (Ford Motors) भारतात दोन प्लांट आहेत, जे साणंद आणि चेन्नई येथे आहेत. कंपनी फिगो, फ्रीस्टाइल, ऍस्पायर यांसारख्या छोट्या कारचे उत्पादन साणंद येथे करत होती. तर इकोस्पोर्ट आणि एंडेव्हर चेन्नई प्लांटमध्ये तयार केले जात होते. अनेक अडचणी असूनही कंपनी निर्यातीसाठी कार आणि इंजिन तयार करत होती. आता हा प्रवास संपुष्टात आला आहे. कारच्या सततच्या घटत्या विक्रीमुळे कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागत होता आणि अखेर कंपनीने भारतीय बाजारपेठ सोडण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत शेवरलेट, डॅटसन, हार्ले-डेव्हिडसन, फियाट, जनरल मोटर्स यांसारख्या कंपन्यांनीही भारत सोडला आहे.
दरम्यान, टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या पेट्रोल-डिझेलला देशात आधीपासूनच मोठी मागणी आहे. अशातच कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. देशात सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स सर्वात पुढे आहे. कंपनीच्या Nexon इलेक्ट्रिक कारला देशात मोठी मागणी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Holidays In 2023: पुढील वर्षी तुमच्या सुट्टीच्याच दिवशी येत आहेत 'हे' सण, पाहा संपूर्ण यादी