Tata Curvv Design : Tata Curvv SUVचे प्रोडक्शन मॉडेल जाहीर, जाणून घ्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन डिटेल्स
इंडिया मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये टाटा मोटर्सने कर्व्ह एसयूव्हीचे प्री-प्रॉडक्शन मॉडेल लाँच केले आहे. या इव्हेंटमध्ये टाटा अल्ट्रोज रेसर, सफारी डार्क एडिशन आणि हॅरियर ईव्हीसह अनेक नवीन मॉडेल्सचे दाखवण्यात आले आहेत.
Tata Curvv Design : इंडिया मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये टाटा मोटर्सने (Auto News) कर्व्ह एसयूव्हीचे प्री-प्रॉडक्शन मॉडेल लाँच केले आहे. या इव्हेंटमध्ये टाटा अल्ट्रोज रेसर, सफारी डार्क एडिशन आणि हॅरियर ईव्हीसह अनेक नवीन मॉडेल्सचे दाखवण्यात आले आहेत. ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारला टक्कर देण्यासाठी टाटा कर्व्ह कूप एसयूव्ही सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल.
डिझाइन कशी आहे?
ऑरेंज रंगात सादर करण्यात आलेली टाटा कर्व्ह गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॉन्सेप्ट मॉडेलसारखीच आहे. यात विशिष्ट ग्रिल, रुंद एअर डॅमसह फ्रंट बंपर, हेडलॅम्प क्लस्टर आणि अपडेटेड हॅरियर आणि सफारी एसयूव्हीसारखे फॉग लॅम्प असेंब्ली यांचा समावेश आहे.
मेन डिझाइन एलिमेंट्समध्ये टर्न सिग्नल, स्क्वेअर व्हील आर्च, पिनसर-स्टाइल ड्युअल टोन अलॉय व्हील्स आणि मजबूत बॉडी क्लेडिंगचा समावेश आहे. खिडक्या क्रोममध्ये पूर्ण झाल्या आहेत आणि फ्लश-टाइप डोर हैंडल ऑफर करणारे कर्व्ह हे पहिले टाटा मॉडेल आहे. स्लोप रूफ असलेली रिअर प्रोफाइल खूपच आकर्षक आहे. एसयूव्हीच्या मागील बाजूस क्लीन बंपर, फुल वाइड एलईडी लाइट स्ट्रिप, बंपर-इंटिग्रेटेड टेललॅम्प आणि स्प्लिट एरो रियर स्पॉइलर आहे.
इंटिरिअर आणि स्पेसिफिकेशन्स
टाटाच्या मॉडर्न व्हेइकल लाइनअपच्या अनुषंगाने आगामी कर्व्ह एसयूव्ही अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळणार आहे. एडीएएस टेक्नॉलॉजी सह स्टीअरिंग व्हीलच्या मागे लावण्यात आलेला हेड-अप डिस्प्ले (एचयूडी) हे एक मेन फिचर आहे. कूप एसयूव्हीमध्ये 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, 20 स्पोक स्टीअरिंग व्हील, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, हवेशीर फ्रंट सीट आणि फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
टाटाच्या अॅक्टिव्ह डॉट ईव्ही प्लॅटफॉर्मवर आधारित कर्व्ड एसयूव्ही इलेक्ट्रिक मॉडेल 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल अशी अपेक्षा आहे. टाटा कर्व्हमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय देण्याची ही योजना आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये टाटाचे नवे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे 125 पीएस आणि 225 एनएम चे आउटपुट जनरेट करेल. डिझेल मॉडेलमध्ये नेक्सॉनचे 1.5 एल युनिट मिळेल, जे 115 बीएचपी पॉवर आणि 260 एनएम चे आउटपुट जनरेट करेल.
इतर महत्वाची बातमी-