एक्स्प्लोर

Tata EV : टाटा कंपनीकडून ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला चालना, देशात 4 लाख चार्जिंग पाईंट्सची सुविधा देणार

Tata EV Charging Points : पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत 500 टाटा ईव्ही मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी टाटा ईव्हीने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन सोबत सामंजस्य करार केले आहेत.

मुंबई : भारतात ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात टाटा ईव्ही नेहमी आघाडीवर राहिली आहे. विकासाच्या नव्या टप्प्याला चालना देताना ‘ओपन कोलॅबरेशन २.०’ मार्फत टाटा.ईव्ही भारताच्या ईव्ही चार्जिंग ईकोसिस्टमला वेग देत आहे. येत्या दोन वर्षांमध्ये चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त वाढवून ४००,००० वर पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

हे साध्य करण्यासाठी ३०,००० नवीन सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याच्या उद्देशाने टाटा.ईव्ही प्रमुख चार्जिंग पॉइंट ऑपरेटर्स (सीपीओज)सोबत आपला सहयोग अधिक दृढ करत आहे. ही चार्जिंग स्टेशन्स सर्व ईव्ही निर्माते आणि ब्रँडला समर्थन देतील. ज्यामुळे व्यापक उपलब्धता, सोय आणि सर्व ईव्ही यूझर्स, चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लानर्ससाठी परस्परांना लाभदायक अशा ईकोसिस्टमची खातरजमा होईल.सार्वजनिक, सामुदायिक आणि खाजगी / घरगुती चार्जर्सचे हे व्यापक आणि निर्बाध नेटवर्क उत्सर्जन-मुक्त गतीशीलतेची वाढती मागणी पूर्ण करेल, ईव्हीच्या अंगिकारास प्रोत्साहन देईल आणि हरित, शाश्वत भविष्याकडे वळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती देईल. 

पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत 500 टाटा ईव्ही मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी टाटा ईव्हीने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन सोबत सामंजस्य करार केले आहेत. हे चार्जर्स मुख्य शहरांत आणि महत्त्वाच्या महामार्गांवर स्थापित करण्यात येतील. 

टाटा ईव्ही मेगा चार्जर्स सर्व ईव्हीसाठी खुली असतील पण टाटा ईव्हीच्या ग्राहकांना तेथे प्रवेश आणि दराच्या बाबतीत प्राधान्य मिळेल. भागीदार सीपीओजद्वारा संचालित होणारी मेगा चार्जर्स सोयिस्कररित्या ट्रॅक करता येतील आणि आयआरए.ईव्ही अॅपच्या माध्यमातून सेवांचे पेमेंट एकाच वेळी करता येऊ शकेल ज्यामुळे विविध चार्जिंग अॅप डाउनलोड करण्याची गरज असणार नाही.

‘ओपन कोलॅबरेशन २.०’ च्या लॉन्चविषयी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. शैलेश चंद्रा म्हणाले, “टाटा.ईव्ही सुरुवातीपासूनच भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये आघडीवर राहिली आहे. त्यांनी केवळ जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने आणली नाहीत, तर देशभरात एक मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील स्थापन केले. भारतात ईव्हीची जबरदस्त वृद्धी सक्षम करण्यासाठी आम्ही ‘ओपन कोलॅबरेशन २.०’ लॉन्च केले आहे. आणि आघाडीच्या सीपीओजसोबत भागीदारी करून येत्या दोन वर्षांत चार्जिंग नेटवर्क ४००,००० पॉईंट्सपर्यंत विस्तारित करण्याचे आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे गती, विश्वासार्हता वाढेल, यूझर्सचा चार्जिंगचा अनुभव सुधारेल आणि दुसरीकडे सीपीओजची व्यवहार्यता देखील सुधारून त्यांची वाढ होण्यास मदत होईल. चार्जिंगचा अनुभव सुधारण्यासाठी, आम्ही भागीदारींच्या माध्यमातून मुख्य शहरांत आणि महामार्गांवर टाटा.ईव्ही मेगा चार्जर्स दाखल करण्याबरोबरच दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चरची हमी देणारे टाटा.ईव्ही सत्यापित चार्जर्स सुरू करत आहोत. शिवाय ग्राहकांच्या चिंता आणि समस्या यांचे निराकरण करण्यासाठी तसेच ईव्हीचा अंगिकार वाढत असल्याने चार्जिंग ईकोसिस्टम सहजप्राप्य आणि विश्वसनीय बनवण्यासाठी एक एकीकृत हेल्पलाइन आणि निर्बाध पेमेंट सोल्यूशन देखील दाखल करत आहोत.”

सन २०१९ पासून सर्वात आधी सुरळीत खाजगी / घरगुती चार्जिंग सोल्यूशन्स दाखल करण्यासाठी टाटा समूहाच्या कंपन्यांशी भागीदारी करून आणि नंतर ईव्हीचा झटपट स्वीकार करणाऱ्या शहरात आणि शहराच्या आजूबाजूस सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करून टाटा.ईव्हीने सुरुवातीच्या काळातच ईव्हीचा स्वीकार करणाऱ्यांना महत्त्वाचा आधार आणि प्रोत्साहन प्रदान केले आहे.

टाटा.ईव्हीने आपले ‘खुल्या सहयोगा’चे फ्रेमवर्क २०२३ मध्ये लॉन्च केले आणि चार्ज पॉइंट ऑपरेटर्स तसेच ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी दृढ केली. या सहयोगाचा फोकस प्रामुख्याने लांबचे प्रवास सुरळीत होण्याची खातरजमा करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी आणि विशेषतः महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विस्तारित करण्यावर होता. परिणामी अवघ्या १५ महिन्यांत भारतातील चार्जिंग पॉईंट्सची संख्या दुप्पटपेक्षा जास्त झाली आणि १८००० चार्जर्सच्या वर गेली. टाटा ईव्हीच्या एकत्रित प्रभावामुळे २०० पेक्षा जास्त शहरांत १.५ लाखापेक्षा जास्त खाजगी / घरगुती चार्जर्स, २५०० समुदाय चार्जर्स आणि टाटा डीलरशिप्सच्या ठिकाणी ७५० चार्जर्स बसवण्यात आले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO

व्हिडीओ

Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
चांदा ते बांदा बिबट्यांच्या हैदोसावर वनमंत्र्यांकडून थेट एक कोटी शेळ्यांचा नजराणा, अजित पवारांनी फक्त एका वाक्यात विषय संपवला
Indigo Airlines Crisis: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या मक्तेदारीची चौकशी होणार; हवाई क्षेत्रात 65 टक्के हिस्सा, दररोज 2200 उड्डाणे
Pune BJP : उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
उमेदवार देण्यासाठी भाजप पदाधिकारी अन् स्थानिक नेत्यांची दमछाक; 125 जागांसाठी भाजपने कंबर कसली, 2500 उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
Embed widget