एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'ही' आहे सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार, अपघातात चालकसह मुलेही राहतील सुरक्षित; जाणून घ्या अधिक माहिती

Safest Electric Car: वाहनात उत्पादक कंपनी एमजी मोटर्स (Mg Motors India) भारतात होणाऱ्या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवीन MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक सादर करणार आहे. भारतात ही कार सादर होण्याआधीच या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे.

Safest Electric Car: वाहनात उत्पादक कंपनी एमजी मोटर्स (Mg Motors India) भारतात होणाऱ्या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये आपली नवीन MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक सादर करणार आहे. भारतात ही कार सादर होण्याआधीच या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. युरोपियन न्यू कार असेसमेंट प्रोग्रामने (European New Car Assessment Programme) या कारला ही रेटिंग दिली आहे. MG4 स्टँडर्ड, MG4 कम्फर्ट आणि MG4 लक्झरीसह वाहनाच्या सर्व प्रकारांना 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. युरो NCAP मध्ये, प्रौढ, मुलांचे संरक्षण, पादचारी संरक्षण आणि वाहनातील सुरक्षा फीचर्स कसे काम करते, याची टेस्ट केली जाते. यानंतरच ही सुरक्षा रेटिंग दिली जाते. 

युरो NCAP नुसार, 5 स्टार सुरक्षा रेटिंग वाहनाच्या क्रॅश सुरक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शवते आणि अपघात टाळण्याच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याची पक्की माहिती समोर येते. MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅकने प्रौढ प्रवासी सुरक्षिततेमध्ये 83%, चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये 80%, असुरक्षित रोड यूजर सेफ्टीमध्ये 75% आणि व्हेईकल सेफ्टी असिस्ट फंक्शनमध्ये 78% गुण मिळवले आहेत. MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅकचे सर्व प्रकार MG पायलटसह सुसज्ज आहेत आणि अॅक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट यासारखी फीचर्स आहेत. यात इंटेलिजेंट हाय बीम असिस्ट आणि स्पीड लिमिट असिस्ट फंक्शन्स देखील मिळतात.

ही' आहे सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार, अपघातात चालकसह मुलेही राहतील सुरक्षित; जाणून घ्या अधिक माहिती

Mg4 Electric Car Price & Range : देते 350km ची जबरदस्त रेंज  

MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅकच्या चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, 7kW AC फास्ट चार्जर उपलब्ध आहे. याच्या मदतीने 51kWh आणि 64kWh बॅटरी पॅक अनुक्रमे 7.5 तास आणि 9 तासांमध्ये 10% ते 100% पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. 150kW DC फास्ट चार्जर अनुक्रमे 35 मिनिटे आणि 39 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकतो. याची छोटे बॅटरी पॅक मॉडेल 350km पर्यंतची रेंज देऊ शकते, तर मोठ्या बॅटरी पॅक प्रकारात 452km ची स्टँडर्ड रेंज देऊ शकते. MG 4 EV मध्ये कंपनीने सामान्य डिझाइनचे इंटीरियर दिले आहे. डॅशबोर्डला दोन फ्लोटिंग स्क्रीन मिळतात. ज्यामध्ये 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. दरम्यान, भारतात कंपनी ZS EV कार विकते. ज्याची किंमत 22.58 लाख ते रु. 26.60 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे. कंपनी 2023 मध्ये अधिक परवडणारी ईव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget