Vespa भारतात महागली! जाणून घ्या प्रत्येक व्हेरियंटची नवीन किंमत
Vespa Scooter Price Hike: Piaggio India ने भारतातील त्यांच्या Vespa आणि Aprilia स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Vespa Scooter Price Hike: Piaggio India ने भारतातील त्यांच्या Vespa आणि Aprilia स्कूटरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. Vespa SXL 125 आणि SXL 150 च्या किमती आता अनुक्रमे 1,33,403 आणि Rs 1,47,355 पासून सुरू होतात. या किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. यात आम्ही तुम्हाला Aapro Vespa SXL 125 आणि SXL 150 स्कूटरच्या नवीन किंमत बद्दल माहिती सांगणार आहोत.
व्हेरियंट | किंमत |
SXL 125 | 1,33,403 |
SXL 125 Racing 60s | 1,39,224 |
SXL 150 | 1,47,355 |
SXL 150 Racing 60s | 1,53,023 |
किंमतीत वाढ करण्याव्यतिरिक्त स्कूटरमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्कूटरचे कॉस्मेटिक आणि यांत्रिक तपशील पूर्वीप्रमाणेच अबाधित आहेत. Vespa SXL 125 आणि SXL 150 पूर्वीप्रमाणेच Azure Blue, Matte Black, Matte Red Dragon, Orange आणि Pearl White या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
याशिवाय Vespa Racing 60s ला समान बाह्य पेंट मिळेल. Vespa SXL 125 Racing 60s ही स्कूटर दोन पेंट पर्यायांमध्ये विकली जाते - पर्ल व्हाइट आणि ग्रीन. अधिक पॉवरफुल इंजिन असलेले SXL 150 रेसिंग 60s मॉडेल केवळ एका पर्ल व्हाइट पेंट पर्यायामध्ये विकली जाते. याशिवाय Piaggio ने एप्रिलिया स्कूटरचीही भारतीय बाजारपेठेत किंमत वाढवली आहे.
दरम्यान, Lambretta ने अलीकडेच मिलान डिझाईन वीक 2022 मध्ये आपल्या नवीन G350 आणि X300 स्कूटर सादर केल्या आहेत. या दोन्ही नवीन स्कूटर या महिन्यापासून युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. मात्र या स्कूटर भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.