मोबाइलने लॉक करता येईल ई-स्कूटर; 'या' कंपनीच्या ग्राहकांना मिळणार फीचर
Ola E-Scooter : ओला ई-स्कूटर आता नवीन फीचर लाँच करणार आहे.
Ola E-Scooter :ओला कॅब सर्व्हिससोबत आता ऑटो क्षेत्र आणि टेक्नोलॉजी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत आहेत. मागील वर्षी कंपनीने ई-स्कूटर एस-1 आणि एस-2 प्रो लाँच केली होती. सध्या ओलाच्या ई-स्कूटरची जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीकडून ई-स्कूटरवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. आता कंपनी आपल्या ई-स्कूटरमध्ये आणखी एक फीचर जोडण्याच्या तयारीत आहे.लवकरच हे फीचर लाँच करण्यात येणार आहे.
हे फीचर आहे तरी काय?
ओला इलेक्ट्रीकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्वीट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही लवकरच नवीन अपडेट आणणार आहोत. या अपडेटनंतर अॅप लॉक फीचर अॅक्टिव्ह होणार आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या जवळ ओला इलेक्ट्रिक अॅप मुव्हओएस 2 साठी तयार आहे. तर, ओला इलेक्ट्रिकचे मुख्य मार्केटिंग अधिकारी वरूण दुबे यांनीदेखील ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनुसार, युजर्स आपली ई-स्कूटर अॅपच्या माध्यमातून लॉक करू शकतील. व्हिडिओत हे अॅप कसे काम करणार, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
ओला इलेक्ट्रिकने दिलेल्या माहितीनुसार, नवीन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये नवीन फीचर्स जोडले जात असल्याचे म्हटले. इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रोमध्ये हे फीचर्स नाहीत. कंपनीचा हा पहिला ओव्हर-द-वायर अपडेट आहे. अॅप लॉक फीचरसह नवीन अपडेटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि क्रूज कंट्रोल हे फीचर्सही देण्यात आली आहे.
या फीचर्ससाठी करावी लागणार प्रतिक्षा
ग्राहकांना हिल होल्ड कंट्रोल आणि हायपर मोडसारख्या फीचर्ससाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ई-स्कूटर लाँचिंगच्या वेळी कंपनीने हे मुख्य फीचर्स म्हटले होते. हे फीचर्सही लवकर लाँच होणार असल्याचे कंपनीने म्हटले.