एक्स्प्लोर

Updated Renault Kiger Launched: घसघशीत डिस्काऊंट आणि ऑफरसह Renault Kiger 2023 लॉन्च, पाहा फिचर्स...

New Renault Kiger: रेनॉल्ट कंपनीने नव्या ऑफर्ससह नवीन कार लॉन्च केली आहे. रेनॉल्ट किगरची नवीन आवृत्ती लॉन्च झाली आहे.

Renault Kiger 2023: रेनॉल्ट इंडियाने (Renault India) आज आपल्या रेनॉल्ट किगर (Renault Kiger) कारची अपडेटेड एडिशन लॉन्च केली आहे. ग्राहकांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी अनेक फिचर्स लॉन्च करण्यात आले आहेत. सर्व नव्या फिचर्ससह कंपनी आपल्या नवीन कारवर उत्तम ऑफर देखील देत आहे. जाणून घेऊया काय आहेत रेनॉल्टच्या नवीन गाडीवरील ऑफर्स...

डिस्काऊंट ऑफर्स

रेनॉल्ट किगर (Renault Kiger) ही कार खरेदी केल्यावर, ग्राहकांना 20,000 रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट मिळणार आहेत. कारच्या खरेदीवर 10,000 रुपयांची रोख सूट मिळणार आहे, तर अतिरिक्त 12,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील मिळणार आहे. जर तुम्ही रेनॉल्टचे आधीचे ग्राहक असाल तर तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंतचे लॉयल्टी फायदे देखील मिळू शकतात.

नवीन रेनॉल्ट किगर RXT (O) 2023

कंपनीने आपल्या नवीन रेनॉल्ट किगर कारच्या RXT (O) व्हेरियंटमध्ये वायरलेस 8.0 इंच टचस्क्रीन, एलईडी हेडलॅम्प-टेल लॅम्प, 16-इंच अलॉय-व्हील्स सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. कंपनीने ही कार 7.99 लाख रुपये एक्स-शोरूम किमती(Ex Showroom Price)त सादर केली आहे.

पॉवर ट्रेन

नवीन रेनॉल्ट किगर (Renault Kiger) कारच्या इंजिन (Engine) बद्दल बोलायचे झाले तर ही कार दोन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये पहिले 1.0L टर्बो पेट्रोल (Turbo Petrol) आणि दुसरे 1.0L एनर्जी पेट्रोल (Energy Petrol) इंजिन आहे. त्याच्या ट्रान्समिशन (Transmission) बद्दल बोलायचे झाले तर, त्यात 5 स्पीड इझी आर ऑटोमॅटिक आणि आणखी एक एक्स-ट्रॉनिक सीव्हीटी युनिट उपलब्ध आहे. कंपनीने या कारसाठी 20.62 किलोमीटर प्रति लिटर मायलेजचा दावा केला आहे.

सेफ्टी फिचर्स

रेनॉल्ट किगर (Renault Kiger) 2023 मध्ये दिलेल्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यां (Safety Feautures) बद्दल सांगायचे तर, यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि रेडी प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय यात फ्रंट-साइडमध्ये 4 एअरबॅग (Air bag), स्पीड सेन्सिंग डोअर-लॉक (Speed sensing Door Lock) आणि चाइल्ड सेफ्टी फीचर ISOFIX आहे.

 बाजारपेठेत या कारसोबत आहे मुकाबला

रेनॉल्ट किगरशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये निसान मॅग्नाइट, टाटा पंच, सिट्रोएन सी3, टाटा अल्ट्रोझ, टाटा टिगोर सीएनजी, मारुती सुझुकी बलेनो आणि किया सॉनेट यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या:

Mahindra Thar : महिंद्रा थारचे लवकरच नवीन डिझाइन; आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Embed widget