Upcoming Cars : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च होणार तीन नवीन कार; इलेक्ट्रिक कारचाही समावेश, 'हे' असेल वैशिष्ट्य
New Cars Arriving : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिसेंबर 2022 मध्ये ग्राहकांना दोन कारचे लॉन्चिंग आणि एक इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे.
New Cars Arriving : तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, डिसेंबर महिना जवळपास संपत आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिसेंबर 2022 मध्ये ग्राहकांना दोन कारचे लॉन्चिंग आणि एक इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki Grand Vitara) त्यांची ग्रँड विटारा लॉन्च करणार आहे आणि टोयोटा किर्लोस्कर त्यांच्या Hyrider SUV ची CNG व्हर्जन लॉन्च करणार आहे. तर, Hyundai Motor India 20 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओवर कारचे अनावरण करेल. या कारचे वैशिष्ट्य नेमके काय आहे ते पाहा.
ह्युंदाई आयोनिक 5 (Hyundai Ioniq 5) :
नवीन Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओवरसाठी बुकिंग देखील 20 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल. हे मॉडेल भारतात CBU (कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट) म्हणून येईल आणि त्याची किंमत सुमारे 60 लाख असण्याची शक्यता आहे. ही कार कंपनीच्या ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी 58kWh आणि 72.6kWh बॅटरी पॅकच्या पर्यायासह दिली जाऊ शकते, ज्याला अनुक्रमे 384 किमी आणि 481 किमीची रेंज मिळेल. ही कार RWD किंवा AWD प्रणालीसह येऊ शकते. या कारमध्ये V2L (व्हेइकल 2 लोड), पॅनोरामिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सह 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील.
मारुती ग्रँड विटारा सीएनजी (Maruti Grand Vitara CNG) :
नुकतीच लाँच झालेली मारुती ग्रँड विटारा लाँच होणार आहे. सध्या त्याची तारीख जाहीर झालेली नाही. या कारला सीएनजी किटसह 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल. हेच इंजिन सेटअप मारुती XL6 मध्ये देखील आहे. हे 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले जाईल.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर सीएनजी ( Toyota Urban Cruiser Hyryder CNG) :
टोयोटाने आपल्या Hyrider SUV च्या CNG व्हर्जनसाठी 25,000 रूपयांचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. यात मारुतीच्या ग्रँड विटारासारखीच पॉवरट्रेन मिळेल. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले जाईल. तसेच डिसेंबर महिन्यात ते लॉन्च होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Mini Electric Scooter: मिनी पण जबरदस्त! फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकता 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर