एक्स्प्लोर

Mercedes-Benz : 857 किमी रेंज आणि दमदार फीचर्ससह मर्सिडीजची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 'ही' असेल किंमत

Mercedes-Benz launches EQS 580 : EQC आणि EQS 53 AMG नंतर इलेक्ट्रिक सब-ब्रँड EQS मध्ये लॉन्च होणारे हे तिसरे मॉडेल आहे.

Mercedes-Benz launches EQS 580 : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) भारतात EQS 580 लाँच केले आहे. ज्याची एक्स शोरूम किंमत 1.5 कोटी रुपये आहे. ही भारतातील पहिली स्थानिकरित्या असेंबल केलेली लक्झरी इलेक्ट्रिक कार देखील आहे. EQC आणि EQS 53 AMG नंतर इलेक्ट्रिक सब-ब्रँड EQS मध्ये लॉन्च होणारे हे तिसरे मॉडेल आहे. या कारचे फिचर्स कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

इंजिन आणि स्पीड

मर्सिडीज-बेंझ EQS 580 मध्ये 107.8kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. हे दोन इलेक्ट्रिक मोटर्सशी जोडलेले आहे. या कारचे एकत्रित पॉवर आउटपुट 523 bhp आणि 855 Nm टॉर्क आहे. ही कार फक्त 4.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे. 

ड्रायव्हिंग रेंज

कारची सिस्टीम 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, मर्सिडीजचा दावा आहे की, 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किमीची रेंज मिळते. कंपनीचा दावा आहे की, मर्सिडीज-बेंझ EQS 580 कार एका चार्जवर ARAI-प्रमाणित 857 किमीची रेंज देते. 

लूक आणि डिझाईन

मर्सिडीज-बेंझ EQS 580 एक टोन्ड-डाउन लूक स्पोर्ट्स करते आणि EQS 53 AMG च्या तुलनेत थोडी लहान आहे. Mercedes-Benz EQS 580 ची लांबी 5,216 मिमी आहे. ही कार 5-स्पोक 20-इंच अलॉय व्हील आणि पाच एक्सट्रनल कलरसह उपलब्ध आहे.   

कारचा इंटर्नल लूक 

मर्सिडीज-बेंझ EQS 4MATIC MBUX हायपरस्क्रीनसह येते. ज्यामध्ये तीन मोठे हाय-डेफिनिशन डिस्प्ले आहेत. कंपनीने यामध्ये अनेक इंटीरियर कलर ऑप्शन्स दिले आहेत. त्यात बालाओ ब्राउनसह नेवा ग्रे, स्पेस ग्रेसह मॅकियाटो बेज आणि तपकिरी ओपन-पोर वॉलनट वुड सारख्या रंगांचा समावेश आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यात हेड-अप डिस्प्ले, पुढच्या सीटसाठी मसाज फंक्शन, बर्मेस्टर 3D सराउंड सिस्टम, एअर फिल्टरेशन सिस्टम, 9 एअरबॅग्ज आणि बरेच काही समाविष्ट आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9PM 16 January 2025Zero Hour on Saif Ali Khan | सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, कुटुंबासाठी सैफ ठरला खरा हीरो ABP MajhaSaif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Embed widget