Maruti New Baleno: मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' भारतात लॉन्च, कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
Maruti New Baleno: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन 2022 'बलेनो फेसलिफ्ट' (Maruti Baleno Facelift ) कार भारतात लॉन्च केली आहे.
Maruti New Baleno: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन 2022 'बलेनो फेसलिफ्ट' (Maruti Baleno Facelift ) कार भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन अपडेटसह ही कार लॉन्च केली आहे. पहिल्यांदा ही कार 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 7 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर यामध्ये दुसरा सर्वात मोठा अपडेट करण्यात आला आहे. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिस्टची किंमत भारतात 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
2022 Maruti Suzuki Baleno इंजिन आणि ट्रान्समिशन
नवीन बलेनोमध्ये ग्राहकांना 1.2 लिटर पेट्रोल के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन सोबत मिळणार आहे. ज्यामुळे स्टार्ट/स्टॉप तंत्रामुळे मायलेज वाढवण्यास मदत होईल. हे इंजिन 88.5 एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटी (AGS) ला जोडलेले आहे. ही कार 22.94 kmpl पर्यंत मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
फीचर्स आणि सेफ्टी
नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात Android Auto, Apple CarPlay आणि 40+ कनेक्टेड कार फीचर्ससह नवीन 9.0-इंचाचा SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. तसेच डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, एक ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स ही दिले आहेत.
2022 Maruti Suzuki Baleno ची भारतात किंमत
मारुती सुझुकी चार ट्रिम लेव्हलमध्ये नवीन बलेनो ऑफर करत आहे. यात सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फाचा समावेश आहेत. नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टची भारतात प्रारंभिक किंमत 6.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जी 9.49 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या कारची बुकिंग आधीच सुरू केली होती. ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. भारतात Hyundai i20, Honda Jazz आणि Tata Altroz कारशी याची स्पर्धा होईल.
संबंधित बातम्या:
-
New Lexus ES300h Facelift : हर्षद मेहतालाही घातली होती भुरळ, 'लेक्सस'च्या लेटेस्ट मॉडेलमध्ये जाणून घ्या काय आहे खास...
-
New Baleno 2022 : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लॉन्च होणार मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
-
Volkswagen mid-size sedan : 'या' दिवशी लॉन्च होणार फॉक्सवॅगनची मिड-साईज सेडान, मिळणार जबरदस्त फीचर्स
- New 2023 Toyota Innova : नवीन 2023 'टोयोटा इनोव्हा'मध्ये डिझेल इंजिन नसेल! जाणून घ्या कारशी संबंधित लेटेस्ट माहिती...