New 2023 Toyota Innova : नवीन 2023 'टोयोटा इनोव्हा'मध्ये डिझेल इंजिन नसेल! जाणून घ्या कारशी संबंधित लेटेस्ट माहिती...
New 2023 Toyota Innova : जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटा आपली इनोव्हा कार अपडेट करत आहे.
New 2023 Toyota Innova : जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटा आपली इनोव्हा कार अपडेट करत आहे. कंपनी लवकरच ही कार भारतीय बाजारात सादर करू शकते. मात्र या नवीन कारमध्ये ग्राहकांना एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ऑल न्यू जनरेशन इनोव्हाचा एक फोटो समोर आला आहे. चाचणी दरम्यान घेतलेल्या या फोटोमध्ये कारच्या डिझाईनमध्ये मोठा बदल होणार असल्याचे दिसत आहे.
'हे' असतील नवीन बदल
यात सर्वात मोठा बदल म्हणजे इनोव्हा ही फ्रंट व्हील ड्राइव्ह कार असेल आणि ती TNGA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सध्याची इनोव्हा फॉर्च्युनर सारख्याच IMV प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. मात्र या कारमध्ये हा एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेआउटमधील बदलांमुळे ग्राहकांना आता या कारमध्ये अधिक मोठा स्पेस मिळणार आहे. नवीन प्लॅटफॉर्ममुळे याच्या राईडच्या दर्जात वाढ होणार असून ही कार अधिक आरामदायी होणार आहे. मात्र नवीन इनोव्हा ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इनोव्हाइतकीच मजबूत असेल का? हा एक प्रश्न आहे.
आणखी एक अफवा अशी आहे की, नवीन इनोव्हामध्ये आता डिझेल इंजिन मिळणार नाही. सध्याची इनोव्हा अत्यंत लोकप्रिय असून याच्या डिझेल व्हेरिएंटची सर्वाधिक विक्री होते. नवीन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना पेट्रोल हायब्रिड पर्याय मिळू शकतो. पेट्रोल हायब्रीड पर्यायामुळे या कारची कार्यक्षमता वाढेल. तसेच सध्याच्या इनोव्हा पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा ही जास्त कार्यक्षम असेल. नवीन इनोव्हा अधिक मोठी असू शकते आणि यात अनेक नवीन फीचर्स कंपनी देऊ शकते.
सनरूफ देखील मिळणार
या नवीन इनोव्हामध्ये आता सनरूफही मिळू शकेल! ज्याची ग्राहक अपेक्षा करत होते. सध्याच्या इनोव्हाच्या तुलनेत नवीन इनोव्हामध्ये प्रत्येक बाबतीत मोठा फरक असेल. तसेच याचा डिझेल व्हेरिएंट नसल्यास याच्या विक्रीवर काही परिणाम होईल का? हे या कारच्या लॉन्च नंतर कळू शकेल.
संबंधित बातम्या :
-
New Lexus ES300h Facelift : हर्षद मेहतालाही घातली होती भुरळ, 'लेक्सस'च्या लेटेस्ट मॉडेलमध्ये जाणून घ्या काय आहे खास...
-
New Baleno 2022 : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लॉन्च होणार मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
- Volkswagen mid-size sedan : 'या' दिवशी लॉन्च होणार फॉक्सवॅगनची मिड-साईज सेडान, मिळणार जबरदस्त फीचर्स