Maruti Suzuki : मारुती आणणार नवीन 7 सीटर SUV Y17; Tata Safari ला देणार जबरदस्त टक्कर, 'या' दिवशी होणार लॉन्च
Maruti Suzuki 7 Seater SUV : मारूती सुझुकी 7 सीटर कार Y17 कोडनेम असलेली 3-रो, 7-सीटर SUV आणण्याची तयारी करत आहे.
Maruti Suzuki 7 Seater SUV : दिग्गज वाहन कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या आहेत. नुकतीच मारूती सुझुकीने आपल्या दोन सर्व-नवीन एसयूव्ही (SUV) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक फ्रँक्स क्रॉसओवर (Franks Crossover) आहे आणि दुसरी जिम्नी 5-डोर (Jimny 5 Door Car) लाइफस्टाइल एसयूव्ही आहे. तर, दुसरी (कोडनेम YY8) कार असेल. ही कार 2024-25 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनी Y17 कोडनेम असलेली 3-रो, 7-सीटर SUV आणण्याची तयारी करत आहे. ही कार एकदा लॉन्च झाल्यानंतर महिंद्रा XUV700 आणि Tata Safari शी स्पर्धा करेल. ही कार कंपनीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. या प्लॅटफॉर्मवर ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि टोयोटा हायरायडरसुद्धा (Toyota Hyryder) बनविण्यात आली आहे.
नवीन प्लांटमध्ये होणार निर्मिती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मारुती सुझुकी Y17 SUV ची निर्मिती हरियाणातील (Hariyana) खारखोडा येथे तयार होत असलेल्या नवीन प्लांटमध्ये केली जाणार आहे, जी 2025 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कार या प्लांटमध्ये तयार होणारी पहिली कार असणार आहे. ही कार वर्षाला 2.5 लाख युनिट्सचे उत्पादन करू शकेल असा कंपनीचा दावा आहे.
कशी असेल मारुती Maruti Suzuki 7 Seater Y 17
ही कार ग्रँड विटारापेक्षा (Grand Vitara) लांब व्हीलबेससह येईल. यामुळे या एसयूव्हीला 3 रो सीटिंग लेआउट मिळेल. तसेच, त्यात अधिक स्पेस असेल. ग्रँड विटाराच्या तुलनेत त्याच्या डिझाइनमध्ये बरेच बदल पाहायला मिळतील. या कारमध्ये 1.5-लिटर एनए पेट्रोल आणि मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजी (Strong Hybrid Technology) टोयोटाचे 1.5L 3-सिलेंडर TNGA पेट्रोल दिसू शकते. तसेच, यात टोयोटाचे 2.0L NA पेट्रोल इंजिन मजबूत हायब्रीड टेक्नॉलॉजीसह मिळण्याची शक्यता आहे, जो इनोव्हा हायक्रॉसमध्ये देखील वापरला गेला आहे.
Maruti Suzuki 7 Seater कार कधी लॉन्च होणार? (Launch Date)
Mahindra च्या XUV700, Tata Safari आणि MG Hector Plus ला टक्कर देण्यासाठी मारुतीची नवीन 3-रो SUV लाँच केली जाईल. ही कार 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :