HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
HSC Exam : महाराष्ट्रात कालपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

HSC Exam News परभणी : बारावीची परीक्षा कालपासून सुरु झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. यामध्ये एकाच्या परीक्षेला दुसराच परीक्षार्थी येऊन बसल्याचं उघड झालं. तोतया परीक्षार्थींने पेपर ही लिहिला मात्र उत्तर पत्रिकेवर दोन वेगवेगळ्या सह्या दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात त्या परीक्षार्थ्यांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर आज बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला त्याने पेपरही दिला. याबाबत शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी त्याठिकाणी तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर ससाणे यांनी केंद्र प्रमुख यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून केंद्र प्रमुख अंकुश भोसले यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वैभव केशवराव कदम याच्या विरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॉल प्रॅक्टिस एक्ट युनिवर्सिटी,बोर्ड अँड ऑदर स्पेसिसाईट एक्झामिनेशन ए अॅक्ट 07 नुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान जिल्ह्यात मोठा गाजावजा करत कॉपी मुक्त अभियान राबवणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक ठिकाणी कॉपी करण्यात आलीय ज्यात विविध ठिकाणी 11 जणांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : देवेंद्र फडणवीस
दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.
इयत्ता बारावीची परीक्षा कालपासून सुरु झाली असून 18 मार्च पर्यंतच्या कालावधीत 3373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

