Tata Nexon EV: ग्राहकांसाठी मोठी बातमी, Tata Motors ने Nexon EV Max च्या किंमतीत केली घट; जाणून घ्या नवीन किंमत
Tata Nexon EV Price: अलीकडेच महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 देशात लॉन्च केली आहे. यानंतर टाटा नेक्सन ईव्हीला महिंद्राकडून मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
Tata Nexon EV Price: अलीकडेच महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 देशात लॉन्च केली आहे. यानंतर टाटा नेक्सन ईव्हीला महिंद्राकडून मोठं आव्हान निर्माण झालं आहे. हे पाहून टाटा मोटर्सने आपल्या नेक्सन इलेक्ट्रिकच्या किमती घट केली आहे. ज्यामुळे आता ही कार 85,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यासोबतच या कारची रेंजही वाढवण्यात आली आहे. आता Nexon EV Max ची रेंज 437 किमी वरून 453 किमी प्रति चार्ज झाली आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
Tata Nexon EV price Dropped: किती असेल नवीन किंमत?
Tata Nexon EV Max XM व्हेरिएंटची नवीन किंमत 14.49 लाख रुपये झाली आहे. तर याच्या XZ + व्हेरिएंटची नवीन किंमत 15.99 लाख रुपये झाली आहे. आता याचे XZ + Lux व्हेरिएंट 16.99 लाख रुपयांना उपलब्ध आहे. Tata Nexon EV Max मध्ये 40.5kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे, 3.3kW आणि 7.2kW चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. 3.3kW चार्जरसह Nexon EV Max ची एक्स-शोरूम किंमत 16.49 लाख ते 18.49 लाख दरम्यान आहे. तर 7.2kW चार्जरसह EV Max ची बाजारातील किंमत 16.99 लाख ते 18.99 लाख दरम्यान आहे. ज्यामध्ये आता Nexon EV Max XM व्हेरिएंटची किंमत 16.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत 17.49 लाख, XZ+ लक्स व्हेरिएंटची किंमत 18.49 लाख, XZ+ व्हेरिएंटची किंमत ₹17.99 लाख, XZ+ लक्सची (7.2 kW) किंमत 19 लाख झाली आहे.
Nexon EV Prime मध्ये 30.2kWh बॅटरी पॅक मिळतो. जो फ्रंट-एक्सल माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसह 129PS आणि 245 Nm आउटपुट करतो. यात ड्राइव्ह आणि स्पोर्ट्स सारखे ड्राइव्ह मोड मिळतात. याला प्रति चार्ज 312 किमीची रेंज मिळते. Nexon EV Max 40.5kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. जी इलेक्ट्रिक मोटरसह 143PS आणि 250Nm आउटपुट देते. याला प्रति चार्ज 453 किमी टॉर्कची ARAI प्रमाणित रेंज मिळते.
Tata Nexon EV price Dropped: फीचर्स
Tata Nexon EV Max मध्ये ZConnect अॅप्लिकेशनसह प्रगत ZConnect 2.0 कनेक्टेड कार तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये 48 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध आहेत. सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत, इलेक्ट्रिक SUV ला हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि ऑटो व्हेईकल होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि i-VBAC (इंटेलिजेंट - व्हॅक्यूम-लेस बूस्ट आणि सक्रिय नियंत्रण) सह ESP मिळते.
इतर महत्वाची बातमी: