या गाड्या परदेशात धडाधड विकल्या जात आहेत, भारतातही किंमत खूप कमी
Maruti Suzuki exports raised: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची निर्यात 2022 मध्ये 28 टक्क्यांनी वाढून 2,63,068 युनिट्स झाली आहे
Maruti Suzuki exports raised: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची निर्यात 2022 मध्ये 28 टक्क्यांनी वाढून 2,63,068 युनिट्स झाली आहे, जी कंपनीची आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात आहे. कंपनीने मंगळवारी जारी केलेल्या एका निवेदनातून ही माहिती दिली. कंपनीने यापूर्वी 2021 मध्ये सर्वाधिक 2,05,450 कार निर्यात केल्या होत्या. गेल्या वर्षी डिझायर, स्विफ्ट, एस-प्रेसो, बलेनो आणि ब्रेझा या मॉडेल्सची सर्वाधिक निर्यात झाली.
सलग दुसर्या वर्षी निर्यातीत दोन लाखांचा टप्पा पार करणे हे आमच्या उत्पादनांचा विश्वास, गुणवत्ता, विश्वसनीयता, कामगिरी हे ग्राहकांप्रति मैत्रीचे प्रतिबिंब आहे. हे यश जागतिक ग्राहकांसाठी उत्पादने तयार करण्याच्या भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाशी आमच्या दृढ वचनबद्धतेच्या अनुषंगाने असल्याचं मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिसाशी ताकेउची यांनी म्हटलं आहे
कोरोनानंतर विक्री दुप्पट
गेल्या वर्षी त्यांनी 1,07,190 युनिट्सची निर्यात केली, जी कोविडपूर्व वर्ष म्हणजे 2019 मध्ये निर्यात केलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे. 2020 मध्ये, महामारी आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे कंपनीची निर्यात 85,208 युनिट्सवर आली होती. 2018 मध्ये मारुती सुझुकीची निर्यात 1,13,824 युनिट्स होती असं कंपनीने सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात मारुतीचे उत्पादन घटले
दुसरीकडे, कंपनीने अलीकडील माहितीमध्ये सांगितले की, डिसेंबर 2022 मध्ये मारुती सुझुकीचे उत्पादन 17.96 टक्क्यांनी कमी झाले आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये एकूण 1,24,722 कारचे उत्पादन केले, जे 2021 च्या त्याच महिन्यात बनवलेल्या 1,52,029 कारच्या तुलनेत सुमारे 18 टक्के कमी आहे. लहान कार आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटचे उत्पादन गेल्या महिन्यात 83,753 युनिटवर घसरल्याचे कंपनीने म्हटले आहे. छोट्या कारमध्ये अल्टो आणि एस-प्रेसोचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये कंपनी स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर सारखी मॉडेल्स विकते.
कंपनीची घाऊक विक्री कमी
डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकीने एकूण 1,39,347 युनिट्सची घाऊक विक्री केली, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 9 टक्के कमी आहे. कंपनीने डिसेंबर २०२१ मध्ये एकूण १,५३,१४९ वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात, मारुती सुझुकीने देशांतर्गत बाजारात एकूण 1,13,535 वाहनांची विक्री केली, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 1,26,031 वाहनांच्या तुलनेत 9.91 टक्के कमी आहे.