Maruti Suzuki Discount Offers : Maruti Suzuki च्या कार महाग व्हायच्या आधीच खरेदी करा; कारवर डिसेंबरमध्ये बंपर ऑफर्स
Maruti Suzuki Discount Offers : एकीकडे मारुती सुझुकी जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. पण त्याआधी डिसेंबरमध्ये मारुतीने आपल्या जिम्नी, फ्रॉन्क्स आणि ग्रँड विटारावर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे
Maruti Suzuki Discount Offers : एकीकडे मारुती सुझुकी (Maruti Suzuki) जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. पण त्याआधी डिसेंबरमध्ये मारुतीने आपल्या जिम्नी, फ्रॉन्क्स आणि ग्रँड विटारावर मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. ज्याचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. कंपनीकडून कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसच्या स्वरूपात ही डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.
Maruti Suzuki Jimny :मारुती सुझुकी जिम्नीवर सूट
मारुती सुझुकीने नुकतीच आपली थंडर एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. जिमनीच्या एंट्री लेव्हल झेटा व्हेरियंटवर आता या महिन्यात 2.3 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, तर अल्फा आणि जेट व्हेरियंटवर 2 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
Maruti Car : मारुती सुझुकी फ्रॉंक्सवर सूट
मारुतीची ही कार देशात कुठेही खरेदी केल्यास 40,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ही कार बलेनोवर आधारित आहे, ज्याला खूप पसंत केले जात आहे आणि म्हणूनच ही एसयूव्ही लाँचिंगपासून नेक्साच्या माध्यमातून विकली जाणारी सर्वात जास्त विकली जाणारी कार राहिली आहे.
Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकी ग्रँड विटारावर सूट
मारुती या महिन्यात आपल्या ग्रँड विटारावर 35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, जी त्याच्या हायब्रिड व्हेरियंटवरही लागू आहे, तर कंपनी नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे.
Car Price : कंपनीने कारची किंमत का वाढवली?
दिग्गज कार निर्माता कंपनी मारूती सुझुकीने (Maruti Suzuki) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बीएसई फाईलिंगमध्ये मारूती सुझुकीच्या कंपनीकडून असे स्पष्ट करण्यात आले की, महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या दरांमुळे वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मारूती सुझुकीनेसंदर्भात माहिती दिली की कंपनी जानेवारी 2024 पासून कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. बीएसई फाईलिंगमध्ये कंपनीने कारच्या किंमती वाढविण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या दरांमुळे वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मारुती सुझुकीच्या सर्वच गाड्यांच्या मॉडल्सच्या किंमतीत वाढ होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांची किंमत साधारण साडे तीन लाख ते 29 लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. वाढलेल्या कारच्या किंमतीमध्ये अल्टोपासून ते इन्व्हिक्टो गाडीपर्यंतचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीकडून कोणत्या गाडीच्या माॅडेलमध्ये किती रुपयांची वाढ होणार याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :