Car : Innova HyCross की Innova Crysta? तुमच्यासाठी कोणती कार चांगली? जाणून घ्या
Innova HyCross vs Innova Crysta : सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इनोव्हा क्रिस्टाच्या तुलनेत, इनोव्हा हायक्रॉस थोडी मोठी असेल आणि तिचा व्हीलबेसही लांब असेल.
![Car : Innova HyCross की Innova Crysta? तुमच्यासाठी कोणती कार चांगली? जाणून घ्या Innova HyCross vs Innova Crysta Should You Wait for Innova New model Price Feature marathi news Car : Innova HyCross की Innova Crysta? तुमच्यासाठी कोणती कार चांगली? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/203de7fa172317db222284f3c7a618131662465213828358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Innova HyCross vs Innova Crysta : सध्या सगळीकडे सणासुदीचे दिवस आहेत. सण म्हटलं की नवीन वस्तू घेणं आलंच. जर तुम्ही या दिवसांत नवीन कार (Car) घेण्याच्या विचारात असाल तर टोयोटा कंपनी आपली नवीन MPV इनोव्हा हायक्रॉस (Innova HyCross) भारतात अनावरण करणार आहे. त्यानंतर या कारची लवकरच विक्री होईल. नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित ही एकदम नवीन इनोव्हा कार आहे जी सध्याच्या इनोव्हा क्रिस्टापेक्षा (Innova Crysta) पूर्णपणे वेगळी आहे. मात्र, सध्याची इनोव्हा डिझेल इंजिनसह विकली जाईल.
नवीन इनोव्हा हायक्रॉसचा आकार खूपच मोठा आणि आलिशान असेल. ही कार हायब्रिड व्हर्जन म्हणून सादर करण्यात येईल. ज्यामध्ये 2.0L पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर मिळेल. तसेच एक मानक 2.0L पेट्रोल इंजिन प्रकार देखील उपलब्ध असणार आहे. मानक पेट्रोल प्रकार देखील इनोव्हा क्रिस्टलच्या 2.7L पेट्रोल इंजिन युनिटपेक्षा अधिक कार्यक्षम असेल. परंतु, हायब्रिड व्हर्जन अधिक इंधन कार्यक्षम असेल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची तुलना करून इनोव्हा डिझेल निवडणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय असेल. हायब्रीड इनोव्हा हायक्रॉसचा उद्देश इंधन खर्च कमी करण्याचा आहे.
'हे' फिचर्स मिळतील
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इनोव्हा क्रिस्टलच्या तुलनेत, इनोव्हा हायक्रॉस थोडी मोठी असेल आणि तिचा व्हीलबेसही लांब असेल. सध्याच्या इनोव्हा प्लॅटफॉर्मऐवजी फ्रंट-व्हील ड्राईव्ह प्लॅटफॉर्मवर हायक्रॉस तयार केल्यामुळे लांबचा व्हीलबेस आहे. म्हणजेच नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये जास्त जागा, जास्त स्टोरेज स्पेस आणि जास्त इंधन कार्यक्षमता मिळेल. या नवीन कारमध्ये सनरूफ, प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, हवेशीर जागा, मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
इनोव्हा हायक्रॉस डिझेल क्रिस्टापेक्षाल चांगली कार :
नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड सध्याच्या इनोव्हापेक्षा अधिक प्रीमियम आणि महाग असेल. ही कार आगामी काळात किआ केरेन्सशी स्पर्धा करेल. तर, ज्यांना डिझेल इंजिन हवं आहे अशा ग्राहकांसाठी इनोव्हा क्रिस्टा चांगला पर्याय आहे. परंतु, हायब्रीड टेक्नॉलॉजी, अधिक वैशिष्ट्ये आणि हायक्रॉसचे अधिक प्रीमियम अनुभव प्रीमियम एसयूव्ही खरेदीदारांना देखील आकर्षित करू शकतात. त्यामुळे ही कार कमी कालावधीत खूप लोकप्रिय होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)