एक्स्प्लोर

होप ऑक्सो इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च, एका चार्जवर गाठणार 150Km चा पल्ला

Hope Mobility ने आज भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Hope OXO लॉन्च केली आहे. Hope Oxo दोन प्रकारांमध्ये ही बाईक सादर केली आहे. यात Oxo आणि Oxo X चा समावेश आहे.

Hop Mobility ने आज भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Hop OXO लॉन्च केली आहे. Hop Oxo दोन प्रकारांमध्ये ही बाईक सादर केली आहे. यात Oxo आणि Oxo X चा समावेश आहे. Hop Oxo ची किंमत 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. होप ऑक्सो ही हाय रेंज आणि हाय स्पीड बाईक आहे. कंपनीचा दावा आहे की ऑक्सो ई-बाईक इतकी सक्षम आहे की ती पेट्रोल बाईकची जागा घेऊ शकते. ही बाईक कंपनीच्या डीलरशिपवरून किंवा वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते.

150 किमीची रेंज 

Hop Oxo पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज देईल, असा कंपनीने दावा केला आहे. इलेक्ट्रिक बाईक शक्तिशाली 3.75 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे. जी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4 तास घेते. तर 100% चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. बाईकची बॅटरी कोणत्याही 16 amp वॉल सॉकेटमधून चार्ज केली जाऊ शकते.

या बाईकचे मागील चाक 72V आर्किटेक्चरच्या 6200W BLDC हब मोटरद्वारे समर्थित आहे. जे जास्तीत जास्त 200Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम वापरण्यात आली आहे, ज्यामुळे लांबच्या राइड्समध्येही बॅटरी थंड राहण्यास मदत होते, असा कंपनीचा दावा आहे.

टॉप स्पीड 

होप ऑक्सोला तीन राइड मोडमध्ये येते. ज्यात इको, पॉवर आणि स्पोर्ट समाविष्ट आहेत. तसेच Hop OXO X मध्ये अतिरिक्त टर्बो मोड देण्यात आला आहे. टर्बो मोडमध्ये Hope Oxo X 90 किमी/तास वेगाने चालवता येते. या मोडमध्ये बाईक फक्त चार सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रतितास वेग पकडते. Hop Oxo ला फक्त पॉवर मोडमध्ये 150 किमीची रेंज मिळते. ऑक्सो ई-बाईकची बॅटरी फिक्स करण्यात आली आहे आणि ती काढून चार्ज करण्याचा कोणताही पर्याय नाही. बाईकची बॅटरी टाकीच्या आत ठेवली आहे. बाईकच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह इलेक्ट्रॉनिक ब्रेक असिस्ट देण्यात आला आहे. बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत.

Oxo मध्ये 5 इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले आहे. या स्क्रीनवर वेग, रेंज, चार्जिंग टाइम, बॅटरी लेव्हल, बॅटरी हेल्थ, मोड यासह अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. बाईकमध्ये 18-इंच फ्रंट आणि 17-इंच अलॉय व्हील आहेत. या  बाईकचे कर्ब वजन (बॅटरीसह) 140 किलो आहे. तर याची लोडिंग क्षमता 250 किलोची आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Hop Oxo X मध्ये इंटरनेट, GPS नेव्हिगेशन, ब्लूटूथ, अँटी थेफ्ट लॉक, पार्क असिस्ट, रिव्हर्स असिस्ट, साइड स्टँड सेन्सर आणि USB चार्जिंग सारखे फीचर्स आहेत. तर Oxo मध्ये इंटरनेट आणि GPS सपोर्ट उपलब्ध नाही. 

कंपनी ऑक्सो बाईकवर विविध प्रकारच्या वॉरंटी देत ​​आहे. Hope Oxo बाईकवर 3 वर्षे, बॅटरीवर 4 वर्षे किंवा 50,000 kms आणि मोटर, कंट्रोलर आणि चार्जरवर 3 वर्षे वॉरंटी देत ​​आहे. तर Oxo X मध्ये या सर्व वॉरंटीसह, बॅटरीवर 4 वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी दिली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget