एक्स्प्लोर

Maruti Suzuki Invicto Review: दमदार वैशिष्ट्यांसह मारुती सुझुकी इनव्हिक्टो सज्ज; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला देते टक्कर

Maruti Suzuki Invicto review: मारुती सुझुकीने आपली इनव्हिक्टो एमपीव्ही लॉन्च केली आहे. जी टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे.

Maruti Suzuki Invicto Review: मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) नवीन लॉन्च होत असलेल्या गाड्यांमध्ये फार बदल झाले आहेत. मारुतीने आपल्या गाड्यांमध्ये अनेक खास फिचर्स आणले आहेत. बलेनो ही मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी 10 ते 12 लाखांच्या बाजार किमतीत उपलब्ध होते. आजकाल मारुती त्यांच्या प्रीमियम Nexa कार विक्रीसाठी अधिक ओळखले जातात. दिवसेंदिवस मारुती सुझुकी ही कंपनी बरीच प्रगत होत आहे, आता त्यांनी टोयोटाच्या गाड्यांना टक्कर देणारी इनव्हिक्टो तयार केली आहे.

ग्लॅन्झा/बलेनो आणि इतर गाड्या हायराइडर/ग्रँड विटारा यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत मारुतीने मारुती सुझुकी इनव्हिक्टो (Maruti Suzuki Invicto) तयार केली आहे. मारुती सुझुकीने या कारसाठी मोठ्या संख्येने बुकिंग मिळवले आहेत. मारुती सुझुकी इनव्हिक्टो (Maruti Suzuki Invicto) ही केवळ रिबॅज केलेली इनोव्हा हायक्रॉस (Innova Hycross) नाही, कारण Nexa ने यात बराच काही बदल केला आहे.

गाडीचा फ्रंट-एंड नेक्सा थ्री ब्लॉक LED DRLs  क्रोम हेवी फ्रंटसह वेगळा दिसतो, तर बंपरसह स्क्रिड प्लेटमध्येही बदल केले गेले आहेत. समोरून Invicto एक SUV सारखी दिसते जी त्यासमान काम करते. तर या गाडीची लांबी देखील त्यातीव वैशिष्ट्याचा एक अतिरिक्त घटक आहे. बाजूला नवीन (लहान) 17-इंच मिश्रधातू आहेत, तर मागील स्टाइलमध्ये अधिक क्रोमसह नवीन टेल-लॅम्प्स मिळतात. Hycross च्या तुलनेत, Invicto मध्ये अधिक क्रोम आहे, तर Nexa Blue देखील त्याच्या प्रीमियम लुकमध्ये भर घालते.

आतील बाजूस डॅशबोर्डपासून खालच्या मध्यभागी कन्सोलपर्यंत सर्वत्र सोनेरी अ‍ॅक्सेंट असलेली ब्लॅक थीम आहे. उत्तम प्रकारे पूर्ण झाल्यावर याला पुन्हा एक प्रीमियम टच येईल. खरंतर मारुती सुझुकी मधील आतापर्यंतच्या डॅशबोर्डसाठी लेदर इन्सर्ट आणि कॉन्ट्रास्ट स्टिचिंगसह ब्लॅक लेदरेट अपहोल्स्ट्रीसह दिसणारी ही सर्वात आलिशान केबिन आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो (Maruti Suzuki Invicto) च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर ते इनोव्हा हायक्रॉसप्रमाणेच आहेत. या गाडीत ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा व्ह्यू, कूल्ड सीट्स, पॉवर्ड हँडब्रेक, मागील दरवाजा सनशेड, कूल्ड कप होल्डर्स, पॉवर टेलगेट, डॅश माउंटेड गियर लीव्हर आणि टचस्क्रीनचा समावेश आहे. ड्रायव्हर सीटसह बाकीचे सीटदेखील आरामदायी आहेत. या गाडीमध्ये अवाढव्य जागा आहे, यासह वैयक्तिक कपहोल्डर आणि बरंच काही आहे. मूड लाइटिंगसह विस्तीर्ण पॅनोरामिक सनरूफ गाडीला अजून चांगला लूक देते. प्रौढ व्यक्ती देखील या गाडीत आरामात बसू शकतात.

मारुती सुझुकी इनव्हिक्टोला (Maruti Suzuki Invicto) फक्त एक हायब्रीड पॉवरट्रेन मिळते. मजबूत हायब्रिड कॉम्बो सुमारे 180bhp आणि eCVT सह आहे, तर कोणताही मॅन्युअल गिअरबॉक्स नसलेली ही पहिली मारुती कार आहे. चांगला ड्रायव्हिंग अनुभव आणि शहर वापरासाठी ही गाडी योग्य आहे. कमी वेगात गाडी चालवायची असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक मोडवर स्विच करु शकता आणि गाडीच्य लाइट स्टीयरिंग सोबत गाडी चालवणं सहज शक्य होतं. तुम्हाला शहरात 17-18kmpl मायलेज मिळेल जे इतक्या मोठ्या कारसाठी आश्चर्यकारक आहे. गाडीची लहान 17 इंच चाकं आरामदायी अनुभव देतात. लांब अंतर कापण्यासाठी ही एक चांगली फॅमिली कार आहे

इनव्हिक्टो टॉप-एंड हायक्रॉसपेक्षा खूपच स्वस्त आहे. 28.4 लाख किंमतीच्या टॉप-एंड आवृत्तीसह ती उपलब्ध होणार आहे. मारुतीने ऑट्टोमन सीट्स किंवा JBL ऑडिओ किंवा ADAS यांसारखी काही वैशिष्ट्यं काढून टाकली आहेत, परंतु इतक्या कमी किंमतीत चांगली गाडी मिळत असल्याने तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. या किमतीतील सर्वोत्तम आणि सर्वात आरामदायी कौटुंबिक कारपैकी मारुती सुझुकी इनव्हिक्टो एक आहे.

कारबद्दल काय आवडलं? - व्हॅल्यू, ब्लॅक इंटीरियर, हायब्रिड पॉवरट्रेन

कारबद्दल काय आवडलं नाही? - ADAS आणि JBL ऑडिओ नाही

हेही वाचा:

Hyundai Exter SUV: ह्युंदाईची नवीन एक्सटर एसयूव्ही लाँच; पाहा कारचा लूक आणि खास वैशिष्ट्यं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget