(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Honda Activa : नव्या अंदाजात येतेय Activa Premium; अद्ययावत फिचर्सची पर्वणी
Honda Activa Premium : नवीन होंडा एक्टिवा प्रिमियममध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटीचं फिचर पाहायला मिळू शकतं. त्यासोबतच या स्कूटरमध्ये 6G व्हर्जनप्रमाणे व्हिल्स दिले जाऊ शकतात.
Honda Activa Premium : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा अॅक्टिव्हाचं (Honda Activa) स्वतःचं वर्चस्व आहे. आता Honda या स्कूटरमध्ये आणखी नवीन अपडेट्स देण्याची तयारी करत आहे. Honda ने Activa Premium या स्कूटरच्या नवीन व्हेरिएंटचा टीझर रिलीज केला आहे. ज्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे Activa चे 7G व्हर्जन असू शकते. किंवा हे सध्याच्या अॅक्टिव्हा 6G चा प्रीमियम व्हेरियंट देखील असू शकतो.
Honda Activa 6G सारखा लूक
टीझरवरून, Activa स्कूटरच्या नवीन व्हेरियंटचा सिल्हूट आणि लायटिंग सिस्टम सध्याच्या Honda Activa 6G प्रमाणेच असल्याचं दिसत आहे. फ्रंट एप्रनमध्ये फॉक्स व्हेंट्स देण्यात आले असून त्याच्या फुल बॉडीवर गोल्ड कलर डिझायनिंग आहे. तसेच, स्कूटरच्या बॅजिंगवरही गोल्ड ट्रिटमेंटची झलक पाहायला मिळते. यावेळी मॅट ग्रीनसह अनेक नवीन रंगांचे पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
फिचर्स
नवा होंडा अॅक्टिवा प्रिमियममध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटीचं फिचर पाहायला मिळू शकतो. कारण देशातील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या हिरो मोटोकॉर्पच्या (Hero Motocorp) प्लेजरसह (Pleasure) इतर अनेक स्कूटरमध्ये हे फिचर दिसून येते. या स्कूटरला 6G व्हर्जन सारखीच व्हिल दिले जाऊ शकतात. पण त्यात अलॉय व्हील मिळतील की, नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
इंजिन
Honda या नवीन Activa मध्ये फक्त BS6 मानक 109.51cc, सिंगल-सिलेंडर इंजिनचाही वापर केला जाऊ शकतो. जे 8,000rpm वर 7.79 bhp पॉवर आणि 5,250rpm वर 8.79 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते.
होंडा अॅक्टिव्हा 6G ची वैशिष्ट्य
होंडा अॅक्टिव्हा 6G मध्येही कंपनीकडून दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. एलईडी हेडलाइट (टॉप व्हेरिएंट- डिलक्स) देण्यात आले आहेत. स्कूटरला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि 12-इंच व्हील मिळतात. तसेच, 10-इंच चाक आणि प्रीलोड अॅडजस्टेबल सिंगल शॉक मागील बाजूस उपलब्ध आहेत. ब्रेकिंगसाठी, या स्कूटरमध्ये पुढील आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :