Fuel Pump Scam: वाहनधारकांनो लक्ष द्या! पेट्रोल पंपवर वाहनात इंधन भरताना होऊ शकते फसवणूक, या गोष्टी ठेवा लक्षात
Petrol Pump Scams In India: असे बर्याच लोकांकडून ऐकायला मिळते की, कुठल्यातरी पेट्रोल पंपावर त्यांची फसवणूक झाली किंवा त्यांच्या गाडीत कमी इंधन भरले गेले.
Petrol Pump Scams In India: असे बर्याच लोकांकडून ऐकायला मिळते की, कुठल्यातरी पेट्रोल पंपावर त्यांची फसवणूक झाली किंवा त्यांच्या गाडीत कमी इंधन भरले गेले. सध्या देशातील अनेक पेट्रोल पंपांवर ही तक्रार सामान्य झाली आहे. तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेलच. भविष्यात अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. ही फसवणूक पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपल्या मुलासोबत मिळून करतो, असा आरोपही अनेक वाहनधारक करतात. तुम्हीही कधीनाकधी तुमच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेला असाल, तेव्हा आपल्या गाडीत आपण जिकते पैसे मोजले त्यापेक्षा काही तेल भरले गेले आहे, असे वाटले असेल. भविष्यात अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. याच गोठींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Petrol Pump Frauds in India: पेट्रोल पंपावर काय करावे?
पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर वाहनात तेल भरण्यापूर्वी तुमच्या आधी ज्या ग्राहकाने आपल्या गाडीत तेल भरले आहे, त्यानंतर पंप कर्मचारीला मशीन पुन्हा झिरोवर सेट करण्यास सांगा. यानंतरच तुमच्या गाडीत इंधन भरा. यानंतरही तुम्हाला इंधनाच्या प्रमाणाबद्दल काही शंका असल्यास तुम्ही Five-Litre Quantity Test ची मागणी करू शकता.
Petrol Pump Frauds in India: Five-Litre Quantity Test म्हणजे काय?
सर्व पेट्रोल पंपांवर सरकारच्या आदेशानुसार 5 लिटर हे प्रमाणित स्केल आहे. जर तुम्हाला वाटलं की तुमच्या गाडीत कमी इंधन भरलं गेलं आहे, तर तुम्ही पेट्रोल पंप कर्मचारी किया मालकाकडे Five-Litre Quantity Test ची मागणी करू शकता. या टेस्टमध्ये मशिनमधून 5 लिटरच्या स्केलमध्ये इंधन भरले जाते आणि या टेस्टमध्ये इंधन कमी आढळल्यास पेट्रोल पंप मालकाच्या विरोधात ग्राहक न्यायालय किंवा अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.
Petrol Pump Frauds in India: या टिप्स ठेवा लक्षात
1. इंधन भरण्यापूर्वी मीटर झिरोवर असेल याची खात्री करा.
2. इंधन भरताना इंधन नोजल ऑटो कट करण्यासाठी सेट करा.
3. इंधन भरताना नेहमी मीटरवर लक्ष ठेवा.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातम्या: