Electric vs petrol scooter : इलेक्ट्रिक स्कूटर की पेट्रोल? वाहनधारकांची पसंती कोणाला?
अलिकडे इलेक्ट्रिक ( Electricc Vehicle) वाहनांना पसंती दिली जात आहे. परंतु, गेल्या काही वर्षात पेट्रोल स्कूटरच्या Honda Activa, TVS Jupiter आणि TVS Ntorq 125 ची चांगली विक्री झाली आहे.
इलेक्ट्रिक गाड्या अलिकडील काही वर्षांमध्ये बाजारात आल्या असल्या तरी पेट्रोलवरील गाड्यांच्या विश्वासामुळे वाहन घेताना लोक त्यांचा विचार करतात. आजही होंडाच्या अॅक्टिव्हा सारख्या पेट्रोल स्कूटर वाहनचालकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता आजही सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरमध्ये अॅक्टिव्हाचा नंबर अग्रस्थानी लागतो. सध्या सर्वाधिक विकल्या जाणार्या पेट्रोल स्कूटरमध्ये Honda Activa, TVS Jupiter आणि TVS Ntorq 125 चा समावेश आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त आहे. परंतु, इलेक्ट्रिक वाहन वापरास चालना मिळण्यासाठी सरकारकडून या गाड्यांवर सबसिडी दिली जाते. त्यामुळे त्यांच्या किमती कमी होतात. इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा पेट्रोल स्कूटरची किंमत कमी आहे. परंतु, या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरचे पार्ट कमी असल्याने इलेक्ट्रिक स्कूटरची देखभाल करणे सोपे आहे. असे असले तरी पुढचा विचार करून लोक पेट्रोल गाडीला पसंती देतात. कारण पेट्रोल स्कूटर अनेक वर्षे चालू शकते. परंतु इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी फक्त 4 वर्षे किंवा त्यापेक्षा थोडी जास्त चालू शकते. शिवाय पेट्रोल स्टूटरला कोणत्याही मर्यादा नाहीत. जास्त दूर अंतराच्या प्रवासासाठी इलेक्टिक स्कूटला मर्यादा येतात.
इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर शहराच्या दृष्टीने सोईचा आहे. या गाड्या वापरास हलक्या आणि कमी खर्चाच्या आहेत. शहरात त्याचे चार्जिंग स्टेशनही उपलब्ध आहेत. परंतु, ग्रामीण भागात किंवा शहरापासून दूरच्या प्रवासावेळी चार्जिंग स्टेशनची उपलब्धता नसल्यामुळे अडचणीचे ठरते. याउलट पेट्रोल स्कूटर कुठेही नेऊ शकता. कारण शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पेट्रोल पंपांची उपलब्धता आहे. परंतु, पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर परवडण्यायोग्य आहेत. त्यामुळे आपला वापर किती आहे, यावर वाहनधारक पेट्रोल स्कूटर खरेदी करायची की इलेक्ट्रिक स्टूटर याचा विचार करतात.
महत्वाच्या बातम्या