Electric Cars : 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
Electric Cars : पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार महाग आहेत. परंतु, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च कमी आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक कारचा पर्याय शोधू लागले आहेत.
Electric Cars : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. मात्र, सध्या पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार महाग आहेत. परंतु, इलेक्ट्रिक कार चालवण्याचा खर्च कमी आहे. त्यामुळे लोक इलेक्ट्रिक कारचा पर्याय शोधू लागले आहेत.
तुम्ही स्वत:साठी इलेक्ट्रिक कार खरेदी केली तर तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज भासणार नाही. परंतु, जर तुमची चिंता स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची आहे, तर आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये टाटा कंपनीची टाटा टिगोल, टाटाचीच नेक्सन कार, ह्युंदाई कोना आणि आणि एमजी ZS या इलेक्ट्रिक कार स्वस्त आहेत.
टाटा टिगोर कार
टाटा टिगोर या इलेक्ट्रिक कारची किंमत 12.24 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात 26 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. त्याची रेंज 306 किमी आहे. कारमध्ये 55 kW (74.7 PS) मोटर आहे. जी 170 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कारमध्ये सिंगल स्पीड ट्रान्समिशनसुद्धा आहे.
टाटा नेक्सन कार
टाटाच्या नेक्सन कारची किंमत 14.54 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. यात IP67 प्रमाणित 30.2 kwh लिथियम-आयन बॅटरी आहे. कारची रेंज 300km पेक्षा जास्त आहे. कारमध्ये कायमस्वरूपी चुंबक एसी मोटर आहे. जी 245 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
एमजी ZS
एमजी ZS ही इलेक्ट्रिक कार 44-kWh बॅटरी पॅक करते. जी नियमित 15 अँपिअर वॉल सॉकेटमधून 17-18 तासांत पूर्णपणे चार्ज होते. या कारची बॅटरी 50 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते. एका चार्जवर ही कार 499 किमीची रेंज देते. या कारची किंमत 20.99 लाख रुपये पासून सुरू होते.
ह्युंदाई कोना
ह्युंदाई कोनाही इलेक्ट्रिक SUV कार आहे. ह्युंदाई कोना या कारची किंमत 23.79 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 39.2 kWh ची बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 452 किमीची रेंज देते. या कारची बॅटरी एका तासात 80 टक्के पर्यंत चार्ज होते.
महत्वाच्या बातम्या
- कशी आहे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक? इंडियात होणार का लॉन्च, जाणून घ्या...
-
Tata Altroz DCA : टाटाची नवीन Tata Altroz DCA ऑटोमॅटिक कार लवकरच बाजारात उपलब्ध होणार, वाचा संपूर्ण रिव्ह्यू
- Nitin Gadkari : वाहनांच्या सुरक्षिततेचं काय? कार्ससाठीच्या सेफ्टी रेटिंगबाबत नितीन गडकरींकडून राज्यसभेत स्पष्टीकरण
- Nitin Gadkari : 'अब की बार, हायड्रोजन कार!' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी हायड्रोजन इंधनाचा पर्याय