एक्स्प्लोर

Nitin Gadkari : 'अब की बार, हायड्रोजन कार!' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी हायड्रोजन इंधनाचा पर्याय

इलेक्ट्रीक वाहनांच्या जोडीला ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर चालणारी कारही समोर आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या कारचा वापर सुरु केला आहे. विशेष म्हणजे ही कार एकदा टाकी फुल केल्यास तब्बल 600 किमीचा प्रवास करु शकते

Nitin Gadkari in Hydrogen Car : एकीकडे वाढतं प्रदूषण तसंच इंधनाचे वाढते भाव म्हणून इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय आता समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध कार कंपनी टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर (Hydrogen based Fuel Cell Electric car) चालणारी भारतातील पहिली वहिली कार समोर आली होती. या मिराई (Toyota Mirai) कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला. प्रदूषण नियंत्रणासाठी हायड्रोजन इंधन वापराच्या पर्यायाची पडताळणी करण्यासाठी गडकरींनी हा प्रवास केला.

संबधित कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांनी मिळून तयार केली आहे. ग्रीन हायड्रोजनच्या आधुनिक तंत्रज्ञानावर ही कार आधारीत असून या कारचं नावही विशेष आहे. कारण जापानी भाषेत मिराईचा अर्थ भविष्य असा असल्याने ही कार वाहनांचं भविष्यचं म्हणावी लागेल. या कारचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामिल करण्यात आलं असून 1300 किलोमीटरचा प्रवास या कारमधून करण्यात आला होता.

पेट्रोल-डिझेलला पर्याय

पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन, एफसीईव्ही तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता पसरवणे आणि भारतात हायड्रोजन-आधारित कार्सचा प्रसार करणे या कारच्या लॉन्चमागील मुख्य उद्देश आहे. तीन हायड्रोजन सिलेंडर कारमध्ये असून हायड्रोजन कार म्हणून ही भारतातील पहिलीच कार असल्याने यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये 1.4 किलोवॅटची बॅटरी आहे. कारच्या मायलेजचा विचार करता एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरण्याची क्षमता असून एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करु शकते.  ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे केले जाते. आणि ह्या प्रक्रियेला विद्युतविघटन(इलेक्ट्रोलिसिस) म्हणतात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायजरचा वापर करण्यात येतो. 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget