Car Care Tips: थंडीत नाही येणार गाडीला धक्का मारण्याची वेळ; फक्त करा 'हे' काम
Car Care Tips: जर तुमच्याकडे गाडी असेल, तर तुम्हालाही थंडीत गाडी बंद पडल्याचा किंवा लवकर सुरू होत नसल्याचा अनुभव आला असेल. असं का होतं? हे टाळावं कसं? हे जाणून घ्या.
Car Care Tips in Winter Season: ऋतू कोणताही असो... उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा (Winter)... तुमच्या कारची नेहमी चांगली काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा, खराब हवामानामुळे गाडी खराब होण्याची शक्यता असते. त्यात हिवाळा म्हटलं की गाडीशी संबंधित समस्या आणखी जाणवतात.
सकाळी कामावर जायची घाई... त्यात सारखी किक मारून दमवणारी बाईक... किंवा चावी फिरवून फिरवून दमछाक करणारी कार... आणि मग... दहा-पंधरा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कशीबशी चालू होणारी गाडी... हे गुलाबी थंडीतलं चित्र अनेकांनी अनुभवलं असेल. अशा थंडीच्या वातावरणात हे रोखावं कसं? कारची (Car) काळजी घ्यावी कशी? याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स आज जाणून घेऊया.
कारची बॅटरी चार्ज्ड हवी
हिवाळ्याच्या काळात याचा सर्वाधिक परिणाम होतो. एखादी कमी चार्जिंगची बॅटरी तुम्ही उन्हाळ्यात कशीतरी चालवू शकता, परंतु हिवाळ्यात ती जवळजवळ पूर्णपणे मृत होईल, म्हणजेच संपेल. त्यामुळे विशेषतः जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल, तेव्हा तुमच्या कारची बॅटरी नक्की तपासा आणि जर ती नीट काम करत नसेल तर ती बदलून घ्या, जेणेकरून तुमची कार मधेच बंद पडून तुम्ही रस्त्यात मध्ये कुठे अडकणार नाही.
इंजिन गरम करा
हिवाळ्यात कारच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि कोणतंही नुकसान टाळण्यासाठी इंजिन गरम करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, कुठेही जाण्यापूर्वी कार सुरू करा आणि काही मिनिटे तशीच ठेवा, त्यानंतरच कुठेही जाण्यासाठी निघा.
ब्रेक तपासा
थंडीच्या मोसमात धुक्यामुळे रस्ते निसरडे होतात. ज्यावर गाडी घसरण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गाडीचे ब्रेक चांगल्या स्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अचानक ब्रेक लागल्यास कोणताही अपघात टाळता येईल.
कारच्या लाईट्स चेक करा
हिवाळ्यात दिवस लहान होतात आणि रात्र लांबते. याचा अर्थ दिवसाचा प्रकाश काही काळासाठीच उपलब्ध असतो. त्यामुळे, तुमच्या कारचे दिवे (हेडलाइट्स, टेल लाइट्स, टर्न इंडिकेटर आणि बॅक लाइट) व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे तपासणं महत्त्वाचं आहे. कोणतीही लाईट खराब झाली असेल तर ती त्वरित बदला.
इंजिन ऑइल/कूलंट तपासा
जर तुम्ही इंजिन ऑइल आणि कूलंट बराच काळ बदलला नसेल तर तो टॉप अप करण्याऐवजी बदलून घ्या. गाडीतलं ऑइल घट्ट झालंय का? म्हणजेच गोठलंय का? ते पाहा, असल्यास ते बदला. हिवाळ्यात हलकं इंजिन ऑइल वापरणं चांगलं, यासाठी तुम्ही तुमच्या कारसोबत दिलेल्या युजर मॅन्युअलची आणि कंपनीने काय शिफारस केली आहे याचीही मदत घेऊ शकता.
विंडशील्ड वाइपर तपासा
ते थंड हवामानात खूप महत्वाची भूमिका बजावतात, जर ते तुटलेलं किंवा खराब दिसत असेल तर ते त्वरित बदला.
विंडशील्ड क्रॅक झाली का?
हा कारचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो धूळ, माती, पाणी इत्यादींना केबिनमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यामुळे त्यात काही भेगा वगैरे आहेत का हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचे थेंब आतमध्ये झिरपू शकतात. याशिवाय हिवाळ्यात त्यावर धुके आणि धूळ साचण्याची शक्यता अधिक असते. पण केबिनच्या बाहेरील आणि आतील तापमानाचा समतोल साधून हे टाळता येते.
कारचे टायर चांगल्या स्थितीत असले पाहिजेत
हिवाळ्यात कारच्या टायरच्या चांगल्या स्थितीव्यतिरिक्त, त्यांची खोली देखील पुरेशी असावी. कारण रस्ते निसरडे असतात, त्यामुळे अचानक ब्रेक लावताना कार घसरण्याची शक्यता असते. टायर फाटला किंवा खराब झाला असेल तर तो ताबडतोब बदलून घ्या.
हेही वाचा: