(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटिश ब्रँडच्या BSA Gold Star 650 बाईकची भारतीय बाजारात एन्ट्रीची तयारी, जाणून घ्या किती असेल किंमत
BSA Gold Star 350 Price in India : ब्रिटीश बाईक निर्माता कंपनी क्लासिक लीजेंड्स आपल्या बाईक भारतीय बाजारपेठेत आणत आहे. BSA Gold Star 650 ही बाईक भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लॉन्च केली जाईल.
BSA Gold Star 350 Price in India : महिंद्रा समूहाची उपकंपनी असलेली क्लासिक लीजेंड्स भारतीय बाजारपेठेत BSA ब्रँड परत आणण्याच्या तयारीत आहे. अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या BSA Gold Star 650 ही बाईक यावर्षी 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने या बाईक संदर्भात एक नवीन टीझर देखील शेअर केला आहे. या टीझरमध्ये ब्रिटिश ब्रँडने भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली बाीक लॉन्च करणार असल्याची माहिती दिली आहे.
ब्रिटिश ब्रँडने टीझर शेअर केला
ब्रिटिश ब्रँड Classic Legends ने BSA Gold Star 650 चा टीझर शेअर केला आहे. यामध्ये कंपनीने सांगितले की, येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतातील ग्राहकांसाठी क्लासिक लीजेंड्स एक बोल्ड आणि मोठी भेट घेऊन येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल उत्पादक कंपनीत सामील होण्यासाठी सज्ज व्हा.
BSA गोल्ड स्टार 650 ची प्रतिस्पर्धी बाईक
बीएसए गोल्ड स्टार 650 बाईक ही एनफील्ड इंटरसेप्टर 650 या बाईकला जोरदार टक्कर देऊ शकते. BSA Gold Star 650 ला उत्कृष्ट लूक देण्यासाठी क्रोमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. त्याच वेळी या बाईकची इंधन टाकी डिझाइन ही या आधीच्या मॉडेल्समधून घेतले गेले आहे. BSA हा ब्रिटीश वाहन निर्मात्यांमध्ये एक उत्कृष्ट ब्रँड आहे आणि आता तो भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास तयार आहे.
बाईकचे इंजिन किती शक्तिशाली असेल? (BSA Gold Star 650 Mileage)
BSA च्या या बाइकला 652 cc, लिक्विड-कूल्ड, 4-व्हॉल्व्ह सिंगल सिलेंडर मोटार, ट्विन स्पार्क प्लगचे इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 45 bhp पॉवर आणि 55 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच 5-स्पीड गियर बॉक्सचे फीचरदेखील यामध्ये मिळणार आहे.
मोटरसायकलच्या क्लासिक लूकशी जुळण्यासाठी ब्रिटिश ब्रँडच्या या बाईकमध्ये स्पोक्ड रिम्स बसवण्यात आले आहेत. ब्रेकसाठी, या बाइकमध्ये सिंगल 320 मिमी फ्लोटिंग डिस्क, ब्रेम्बो ट्विन-पिस्टन फ्लोटिंग कॅलिपर, पुढच्या बाजूला एबीएस आणि सिंगल 255 मिमी डिस्क आहे. या बाईकचे वजन सुमारे 213 किलो आहे.
ब्रिटीश ब्रँड बाईकची किंमत (BSA Gold Star 350 Price in India)
BSA Gold Star 650 ची किंमत प्रतिस्पर्धी मोटरसायकल रॉयल एनफिल्डच्या रेंजमध्ये असू शकते. या बाईकची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आहे. त्यामुळे येत्या काळात ही बाईक लोकांच्या पसंतीत उतरते का याबद्दल उत्सुकता आहे.
ही बातमी वाचा: