BMW X7 Facelift भारतात लॉन्च, किंमत 1.22 कोटी; जाणून घ्या फीचर्स
BMW X7: जर्मन वाहन उत्पादक कंपनी BMW ने आपल्या X7 कारचा फेसलिफ्टेड व्हर्जन देशात लॉन्च केला आहे.
BMW X7: जर्मन वाहन उत्पादक कंपनी BMW ने आपल्या X7 कारचा फेसलिफ्ट व्हर्जन देशात लॉन्च केला आहे. कारला तीन रो सेटअपसह रीप्रोफाइल्ड फ्रंट एंड मिळते. यासोबतच याचे इंजिन आणि केबिनही अपडेट करण्यात आले आहेत. या कारचे दोन प्रकार बाजारात आले आहेत. ज्यामध्ये xDrive40i पेट्रोल व्हेरियंटची किंमत 1.22 कोटी रुपये आणि xDrive40d डिझेल व्हेरिएंटची किंमत 1.25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याच कारबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत...
BMW x7 फेसलिफ्ट पॉवरट्रेन
BMW X7 xDrive40i आणि xDrive40d अनुक्रमे 3.0-लिटर, इनलाइन-सहा-सिलेंडर पेट्रोल आणि 3.0-लिटर, इनलाइन-6-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहेत. जे 48V माईल्ड-हायब्रिड प्रणालीसह सुसज्ज आहे. पेट्रोल इंजिन एकूण 381 hp आणि 520 Nm चे आउटपुट जनरेट करते. या पेट्रोल इंजिनसह लक्झरी SUV केवळ 5.8 सेकंदात 0-100kph स्पीड पकडू शकते. तसेच माईल्ड -हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या xDrive40d डिझेल इंजिनला 340hp आणि 700Nm चे आउटपुट मिळते. जे सध्याच्या मॉडेलपेक्षा 75 hp आणि 80 Nm जास्त आहे. या इंजिनच्या मदतीने ही कार केवळ 5.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. या दोन्ही इंजिनांना xDrive ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते.
BMW X7: लूक
फेसलिफ्ट X7 ला नवीन डिझाइन केलेला फ्रंट एंड मिळतो, ज्याला स्प्लिट-एलईडी हेडलाइट सेट-अप आणि किडनी ग्रिलच्या आत कॅस्केड लाइटिंग एलिमेंट मिळतो. नवीन इलेक्ट्रिक i7 सेडान आणि 7 सिरीजमध्येही ही नवीन डिझायनिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे. यात बोनेट लाईनजवळ एलईडी डीआरएल, रिप्रोफाइल्ड एलईडी टेल-लाइट्स, पुढील आणि मागील बंपरवर सिल्व्हर ट्रिम आणि 20-इंच अलॉय व्हीलसह क्रोम स्ट्रिप देखील मिळते.
BMW X7 फेसलिफ्ट इंटीरियर आणि फीचर्स
BMW X7 फेसलिफ्टच्या आतील भागातही बरेच बदल करण्यात आले आहेत. यात आता अरुंद एअर व्हेंट्स आणि रीडिझाइन केलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, 14.9-इंच टचस्क्रीन रनिंग iDrive 8 सॉफ्टवेअर, व्हॉईस असिस्टंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 14-कलर अॅम्बियंट लाइट बार, फोर-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांचाही समावेश आहे. पॅनोरामिक सनरूफ आणि अपडेटेड ADAS तंत्रज्ञान मिळणार आहे.
'या' करशी होणार स्पर्धा
BMW X7 फेसलिफ्ट भारतातील मर्सिडीज-बेंझ जीएलएसला टक्कर देईल, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.19 कोटी ते 1.21 कोटी रुपये आहे. यासह ही कार Volvo XC90 शी देखील स्पर्धा करेल, ज्याची एक्स-शोरूम किंमत 96.50 लाख रुपये आहे.