Cruise Control: कारमधील 'हा' फीचर आहे खूप उपयुक्त, जाणून घ्या कसा करतो काम
Car Features: अनेकजण कार खरेदी करताना त्या कारचा लूक आणि ती मायलेज किती देते, याचा विचार करतात. मात्र कारमध्ये कोणते खास फीचर्स आहेत की नाही, याबद्दल अद्यापही अनेक लोक विचार करत नाही.
Car Features: अनेकजण कार खरेदी करताना त्या कारचा लूक आणि ती मायलेज किती देते, याचा विचार करतात. मात्र कारमध्ये कोणते खास फीचर्स आहेत की नाही, याबद्दल अद्यापही अनेक लोक विचार करत नाही. गेल्या दशकभरात कार तंत्रज्ञानात बराच बदल झाला आहे. अलीकडे लॉन्च केल्या जाणाऱ्या कार या खूपच आधुनिक असून यात खूप उपयुक्त असे फीचर्स वाहन उत्पादक कंपन्यांकडून देण्यात येतात. असेच एक महत्वाचे फीचर आहे ज्याचं नाव आहे 'क्रूझ कंट्रोल'. या फीचरमुळे तुमचा लांबचा प्रवास आरामदायी आणि आनंदी होतो. या फीचरचा नेमका उपयोग काय आहे आणि हा फीचर कसा काम करतो, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
क्रूझ कंट्रोल
कारमध्ये हे असेच एक फीचर आहे, जे विमानाच्या ऑटो मोडप्रमाणे काम करते. हे फीचर चालू करून, तुम्ही कार चालवताना वेग सेट करू शकता. एक्सलेटर न दाबता कार सेट केलेल्या वेगावर धावत राहणार.
एक्सलेटर
गाडी चालवताना जेव्हा रस्ता रिकामा असेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर अगदी आरामात करू शकता. यामध्ये एकदा स्पीड सेट केल्यावर एक्सलेटर दाबण्याची गरज नाही. सेट केलेल्या वेगाने गाडी आपोआप धावत राहते.
क्रूझ कंट्रोलचे तोटे
या फीचरचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. गाडी चालवताना तुम्ही हे फीचर ऑन केले तरी चालवताना गाफील राहू नका. हे फीचर चालू केल्याने तुम्हाला एक्सीलरेटरपासून आराम मिळतो, परंतु तुमचे स्टीयरिंग व्हीलवर पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. तसेच आपण सतर्क राहणे आवश्यक आहे, जेणेकरून वाहनासमोर अचानक काही आले तर आपण ताबडतोब गाडीचा ताबा आपल्या हातात घेऊ शकता. हे फिचर सध्या फक्त कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. हे फीचर असलेल्या कारसाठी तुम्हाला सामान्य पेक्षा थोडा अधिक खर्च करावा लागतो.
क्रूझ कंट्रोल कार्स
आता भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्येही हे फीचर्स असलेल्या अनेक कारमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये महिंद्रा थार, मारुती ब्रेझा, टाटा नेक्सन , महिंद्रा XUV700, टोयोटा फॉर्च्युनर, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि टाटा पंच या क्रुझ कंट्रोल फीचर असलेल्या कार आहेत.
इतर महत्वाची बातमी: