Auto Expo 2023 : मारुती सुझुकी ऑटो एक्सपोमध्ये जिम्नी 5-डोरसह दोन नवीन SUV लाँच करणार
Maruti Suzuki : 2023 ऑटो एक्स्पोच्या पहिल्या दिवशी मारुती आपली एक संकल्पना इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रदर्शित करेल.
Maruti Suzuki : दिग्गज वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo 2023) दोन नवीन SUV लॉन्च करणार आहे. या दोन्ही एसयूव्ही नवीन ग्रँड विटारा (Grand Vitara) सारख्या रेंजमध्ये सामील होतील. या दोनपैकी एक क्रॉसओवर असणार आहे आणि दुसरी 4x4 वाहन असेल. या दोन्ही एसयूव्ही SUV जिम्नी आणि बलेनो क्रॉस आहेत. जिम्नी ही मारुतीची पहिली SUV असेल जी हार्ड-कोअर ऑफ-रोडर असेल आणि तिचे 5-डोर व्हर्जन भारतीय बाजारपेठेसाठी तयार करण्यात आले आहे. नवीन जिम्नीला जास्त स्पेससह हार्डकोर ऑफ-रोड क्षमता देखील मिळणार आहे.
बलेनो क्रॉस कशी असेल? (Baleno Cross) :
दुसरी एसयूव्ही, बलेनो हॅचबॅकवर आधारित क्रॉसओवर असेल. परंतु, नवीन स्टायलिंग आणि चारी बाजूंनी क्लेडिंगसह फेसलिफ्ट मिळेल. बलेनोवर आधारित असूनही, तिला उच्च ग्राउंड क्लीयरन्स असेल आणि पोर्टफोलिओमध्ये ब्रेझाच्या खाली बसेल. बलेनो क्रॉसमध्ये टर्बो पेट्रोल युनिट मिळण्याव्यतिरिक्त, इतर अनेक बदल अपेक्षित आहेत.
नेक्सा शोरूममध्ये होणार विक्री
मारुती सुझुकी आपला SUV पोर्टफोलिओ वाढविण्याचा विचार करत आहे आणि या दोन नवीन लॉन्चमुळे कंपनीच्या पोर्टफोलिओमधील SUV ची रिक्त जागा भरून निघेल. जिम्नी (Jimny Car) आणि बलेनो क्रॉस (Baleno Cross) या दोन्ही लाइफस्टाइल एसयूव्ही असतील आणि त्यांची विक्री Nexa विक्री आउटलेट्सद्वारे केली जाईल.
कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार देखील प्रदर्शनात सहभागी
या दोन नवीन SUV लाँच करण्याव्यतिरिक्त, मारुती 2023 ऑटो एक्सपोच्या पहिल्या दिवशी एक संकल्पना इलेक्ट्रिक SUV देखील प्रदर्शित करेल. कंपनीने 2022 मध्ये बलेनो, ग्रँड विटारा (Grand Vitara) आणि नवीन ब्रेझा सारख्या अनेक कार लॉन्च केल्या आहेत, ज्या 2023 मध्ये जिमनी आणि बलेनो क्रॉस सारख्या मॉडेल्सच्या लॉन्चसह सुरू राहतील.
महत्त्वाच्या बातम्या :