Auto Expo 2023 Live Updates : मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन
Auto Expo 2023 Live Updates : देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो'चा (Auto Expo 2023) आज दुसरा दिवस आहे.
LIVE
Background
Auto Expo 2023 Live Updates : गेल्या तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून देशातील सर्वात मोठा ऑटो शो 'ऑटो एक्स्पो' (Auto Expo 2023) सुरु होणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 चे 16 वे एडिशन यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ऑटो एक्स्पो कंपोनंट शोचे आयोजन प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले आहे. तर ऑटो एक्स्पो मोटर शो ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे आयोजित करण्यात आले आहे.
ऑटो एक्स्पो 2023 चे पहिले दोन दिवस म्हणजे 11 जानेवारी (आज) आणि 12 जानेवारी हे माध्यमांसाठी राखीव असतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी व्यापार्यांसाठी ते खुले राहील. 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. ऑटो एक्स्पो मोटर शो सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत लोकांसाठी खुला असेल, तर वीकेंडला याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असेल. तसेच या शोच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारीला याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 अशी असेल.
कोणत्या कार कंपन्या सहभागी होत आहेत?
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती सुझुकी, बीवायडी इंडिया, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर इंडिया, एमजी मोटर इंडिया, किया इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटरसह अनेक कंपन्यांचा समावेश असेल. महिंद्रासह अनेक कंपन्या या शोमध्ये सहभागी होणार नाहीत.
कोणत्या गाड्या होणार लॉन्च?
ऑटो एक्स्पोमध्ये येणारी काही खास मॉडेल्स म्हणजे मारुती सुझुकी Jimny 5-डोअर, मारुतीची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही, ह्युंदाई आयोनिक 5, ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट, किया सेल्टोस फेसलिफ्ट, किया कार्निवल, किया ईव्ही9 कॉन्सेप्ट, एमजी एअर ईव्ही, एमजी हेक्टर फेसलिफ्ट, टोयोटामध्ये जीआर कोरोला, टाटा पंच ईव्ही, टाटा सफारी फेसलिफ्ट, बीवायडी सील ईव्हीसह अनेक कार समाविष्ट आहेत.
Auto Expo 2023 : नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन
Auto Expo 2023 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ऑटो एक्स्पो 2023 चे औपचारिक उद्घाटन केले. हा एक्स्पो 11 तारखेपासून सुरू झाला आहे. मात्र आज मंत्री नितीन गडकरी यांनी ऑटो एक्स्पो 2023 चे उद्घाटन केले. तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर हा ऑटो एक्स्पो सुरू झाला आहे. 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांना या एक्स्पोला भेट देण्याची मुभा असणार आहे.
Auto Expo 2023 : मारुतीची फ्रॉन्क्स क्रॉसओवर कार सादर
Auto Expo 2023 : फ्रॉन्क्स क्रॉसओवर कार अनेक छान वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली. या कारमध्ये हेड्स अप डिस्प्लेसह 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि 22.86 सेमी स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यासोबतच यात आर्किमिस साउंड सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड आणि ऍपल कार प्लेसह ऑनबोर्ड व्हॉईस असिस्टंट देखील मिळेल. त्याचवेळी ते वायरलेस चार्जर आणि गियर शिफ्ट इंडिकेटरसह पॅडल शिफ्टरसह सुसज्ज आहे.
Auto Expo 2023 : मारुती सुझुकीची Jimny SUV कार 6 रंगांमध्ये उपलब्ध
Auto Expo 2023 : मारुती सुझुकीची Jimny SUV कार तुम्हाला 6 रंगांमध्ये मिळेल. यामध्ये नेक्सा ब्लू, ब्लूश ब्लॅक, सिझलिंग रेड, पर्ल व्हाइट, ग्रेनाइट ग्रे आणि कायनेटिक यलो या रंगाचा समावेश आहे.
Auto Expo 2023 : मारुती सुझुकीची Jimny SUV कार सादर
Auto Expo 2023 : मारुतीने आपली क्रॉसओवर FRONX कार केली लॉन्च
Auto Expo 2023 : मारुतीने आपली क्रॉसओवर FRONX कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये लॉन्च केली आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कार आहे. तुम्हाला अलॉय व्हीलसह NEXTre' LED DRLs मिळतात. त्याचवेळी, तुम्हाला या वाहनात एक शक्तिशाली 1.0L टर्बो बूस्टर जेट इंजिन देखील आहे. हे वाहन अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.