एक्स्प्लोर

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोचा आज शेवटचा दिवस; इलेक्ट्रिक गाड्यांनी घातला धुमाकूळ, या कार्सची झाली जोरदार चर्चा

Auto Expo 2023: ऑटो एक्सपो 2023 चा आज शेवटचा दिवस आहे. तीन वर्षांनंतर झालेल्या या मोटर शोमध्ये इलेक्ट्रिक कार आणि वाहनांची सर्वाधिक चर्चा झाली.

Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 चा आज शेवटचा दिवस आहे. तीन वर्षांनंतर झालेल्या या मोटर शोमध्ये इलेक्ट्रिक कार आणि वाहनांची सर्वाधिक चर्चा झाली. इंधनाचे नवीन तंत्रज्ञान म्हणून हायड्रोजन कारने (Hydrogen car MG Euniq 7) देखील लोकांचं लक्ष वेधून घेतलं. या ऑटो शोमध्ये अनेक इलेक्ट्रिक दुचाकींचेही प्रदर्शन करण्यात आले. काही खास इलेक्ट्रिक बसही आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिल्या. ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या काही खास वाहनांवर एक नजर टाकूया.

Maruti Suzuki eVX 

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पोमध्ये कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार EVX चे प्रदर्शन केले. 2025 पर्यंत ही कार (Electric SUV eVX) बाजारात दाखल होईल. इलेक्ट्रिक SUV eVX ही कॉन्सेप्ट 60kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित असेल, जी पूर्ण चार्ज केल्यावर 550 किमी पर्यंतची रेंज देईल. कंपनी भारतात इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी बनवण्यासाठी 100 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

MG Euniq 7 

एमजी मोटरने (MG Motor) ऑटो एक्स्पो 2023 च्या दुसऱ्या दिवशी इंधन सेल बिझनेस क्लास MPV MG Unique 7 चे अनावरण केले. ही एमपीव्ही आधुनिक बिझनेस क्लास फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने ही कार ऑटोनॉमस आणि अॅडव्हान्स्ड ड्राइव्ह असिस्टन्स फीचर (ADAS) सह सादर केली आहे. MG Euniq 7 मध्ये 6.4 किलो उच्च दाबाचा हायड्रोजन सिलेंडर बसवण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, याचा सिलेंडर स्पेस ग्रेड मटेरियलपासून बनवला आहे. जो 824 डिग्री पर्यंत तापमान सहन करू शकतो.

Maruti Suzuki Fronx Crossover 

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सला ब्लॅक आणि बोर्डो कलर स्कीम आणि डॅशबोर्डवर मेटल सारखी मॅट फिनिश मिळते. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL), भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपनीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये FRONX चे अनावरण केले. NEXA प्रीमियम डीलरशिपद्वारे विकल्या जाणार्‍या, Fronx ही बॅलेनो हॅचबॅकवर आधारित आहे आणि ती क्रॉसओवर SUV आहे, जी देशातील SUV ट्रेंडला एनकॅश करते.

Ampere Primus electric scooter 

अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या ग्रीव्हज इलेक्ट्रिकने ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये प्राइमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केले. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट BMS सह 3 Kwh LFP बॅटरी तंत्रज्ञान आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 77 किमी प्रतितास आहे, तर ती पाच सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

IONIQ 5 

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये Hyundai ने आपली आलिशान इलेक्ट्रिक SUV IONIQ 5 कार सादर केली. Hyundai IONIQ 5 ही कार 18 ते 21 मिनिटामध्ये 80 टक्के चार्ज होते, असं कंपनीचं म्हणणं आहे. Hyundai IONIQ 5 ही एका चार्जमध्ये 613 किलोमीटर अंतर गाठू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. 

Keyway SR250 

ऑटो एक्सपोमध्ये हंगेरियन कंपनीने आपली रेट्रो लुकिंग बाईक Keeway SR250 लॉन्च केली. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 1,49,000 रुपये ठेवली आहे. कंपनी आपला Keeway SR250 एप्रिल 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करून देईल. कंपनीने या बाईकसाठी बुकिंग देखील सुरू झाली आहे. ही बाईक Benelli किंवा Keeway च्या अधिकृत शोरूममधून किंवा कंपनीच्या वेबसाइटवरून 2,000 रुपयांच्या रकम भरून बुक केली जाऊ शकते. कंपनीने ही रेट्रो लुकिंग बाईक सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक 223 सीसी इंजिनसह सादर केली आहे. जी 7500 rpm वर 1608 hp ची पॉवर, तसेच 6500 rpm वर 16 nm टॉर्क जनरेट करेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget