Cars With ADAS: ADAS सेफ्टी फीचर्ससह येतात 'या' कार्स, पाहा संपूर्ण लिस्ट
ADAS Cars Under 20 Lakhs Rupees: आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 20 लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये ADAS देखील उपलब्ध आहे.
ADAS Cars Under 20 Lakhs Rupees: अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम म्हणजेच ADAS गेल्या काही काळापासून देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. मात्र सध्या भारतात या सुरक्षा यंत्रणेने सज्ज असलेल्या गाड्यांची संख्या जास्त नाही. पण कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरत आहेत. सध्या हे तंत्रज्ञान देशात महाग आहे, त्यामुळे बहुतांश कारमध्ये हे फीचर दिलेले नाही. कारण त्यामुळे गाड्यांची किंमत खूप जास्त वाढते. पण आज आम्ही तुम्हाला देशातील अशाच काही गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 20 लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यामध्ये ADAS देखील उपलब्ध आहे. चला तर मग पाहूया या गाड्यांची लिस्ट...
ADAS Cars Under 20 Lakhs Rupees: होंडा सिटी (2023 Honda City)
Honda Motors ने अलीकडेच तिची सर्वात लोकप्रिय सेडान सिटी अपडेट केली आहे. या कारच्या व्ही व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम अत्याधुनिक आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.37 लाख रुपये आहे. 2023 Honda City च्या बेस व्हेरियंटच्या वरचा हा प्रकार आहे. म्हणजेच ADAS सोबत येणारी ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे. या सेफ्टी सिस्टीममध्ये रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो हाय-बीम, लेन कीप असिस्ट, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
ADAS Cars Under 20 Lakhs Rupees: 2023 Hyundai Verna
दक्षिण कोरियाची ऑटोमेकर ह्युंदाई मोटर्सने काही दिवसांपूर्वी देशात आपली Verna सेडान अपडेट केली आहे, जी न्यू-जनरल Verna म्हणून ओळखली जात आहे. या कारच्या SX (O) व्हेरियंटपेक्षा वरचे सर्व प्रकार स्मार्टसेन्स एडीएएस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे. यामध्ये स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन किपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अव्हायन्स असिस्ट, हाय बीम असिस्ट आणि लेन डिपार्चर वॉर्निंग यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
ADAS Cars Under 20 Lakhs Rupees: Mg Astor
एमजी मोटर्सच्या एस्टरमध्ये ADAS लेव्हल 2 प्रणाली देखील उपलब्ध आहे. ही सुरक्षा प्रणाली या कारच्या टॉप-स्पेक सॅव्ही प्रकारात देण्यात आली आहे. ज्यामध्ये लेन कीप असिस्ट, स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यासारखे फीचर्सचा समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 16.79 लाख रुपये आहे.