Raj Thackeray: शाळेच्या पिकनिकमध्ये राज ठाकरेंची एन्ट्री, मुलांसह शिक्षकांनी घेतली सेल्फी
Raj Thackeray: मुंबईला परत जातांना औरंगाबादमध्ये थांबलेल्या राज ठाकरेंनी एका शाळेच्या सहलीतील मुलांशी संवाद साधला.
Raj Thackeray: चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बीडच्या परळी न्यायालयाने मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे आज परळीत आले होते. दरम्यान मुंबईहून परळीला आणि परळीहून मुंबईला जातांना राज यांचे हेलिकॉप्टर इंधन भरण्यासाठी औरंगाबादमध्ये थांबले होते. मात्र याचवेळी मुंबईला परत जातांना औरंगाबादमध्ये थांबलेल्या राज ठाकरेंनी एका शाळेच्या सहलीतील मुलांशी संवाद साधला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटोही काढला.
परळी येथील न्यायालयात हजेरी लावल्यानंतर राज ठाकरे पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे निघाले होते. दरम्यान त्यांनी मुंबईकडे जातांना औरंगाबादमधील पळशी येथील रिसॉर्ट थांबा घेतला. त्यानंतर ते मुंबईकडे निघण्यासाठी निघाले असतानाच तिथे एका शाळेची सहल आलेली होती. यावेळी शिक्षक आणि विध्यार्थी यांनी राज ठाकरे यांना पाहून एकच आनंद व्यक्त केला. तर मुलांचा उत्साहा पाहून राज ठाकरे कारमधून जाण्याचे टाळत शालेय मुलांमध्ये सहभागी झाले. तसेच शाळकरी मुलांशी संवाद देखील साधला. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटो काढला.
यामुळे न्यायालयाने काढले वॉरंट?
परप्रांतीयांविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी राज ठाकरेंना 2008 मध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती. तर राज यांच्या अटकेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. दरम्यान परळीतही देखील याचे पडसाद उमटले होते. ज्यात परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करत बस फोडली होती. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पुढे पोलिसांनी तपास करत चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने परळी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी आज परळी कोर्टात हजेरी लावत अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. तर न्यायालयाने 500 रुपयांचा दंड ठोठावत राज यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे.
परळीत जंगी स्वागत!
राज ठाकरे बीडच्या परळीत येणार असल्याने मनसेकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. राज ठाकरे ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवर बॅनर लावण्यात आले होते. तसेच गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच तथा धनंजय मुंडे यांचे समर्थक सुशील कराड यांनी 50 फुटाचा हार राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी बनवला होता. तर राज यांनी देखील गाडीतून उतरून कराड यांचे स्वागत स्वीकारल्याचे पाहायला मिळाले.
इतर संबंधित बातम्या: