Aurangabad Agriculture News: ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
Agriculture News: चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता
Aurangabad Agriculture News: आधीच अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरिपाचे पीकं हातून गेली आहे. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी (Farmers) रब्बीची पेरणी (Rabbis Sowing) केली असून, पिक बहरलेले आहे. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनमध्ये बोलली जात आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद पैठण, सिल्लोड ,फुलंब्री, सोयगाव, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील परिसरात यंदा परतीच्या पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे अनेकांचे हातात आलेले खरीप पिक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) पाणीपातळी वाढली असून, विहिरींत पाणीसाठा देखील वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची तयारी केली. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशीची झाडे उपटून टाकली. त्या कपाशीच्या शेतामध्ये मका, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला, आदी पिकांचा पेरा घेतला. पण आता ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणामुळे चिंता वाढली...
पाणी उपलब्ध असल्याने रब्बी पिकांतून उत्पादनाची आशा वाढीस लागलेली असतानाच ढगाळ वातावरण, धुके, पिकांवरील रोगराई यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ढगाळ वातावरणामुळे गव्हाची पेरणीही टाळली आहे. काहींनी गव्हाऐवजी हरभऱ्याला व जनावरांना खाण्यासाठी चारा म्हणून शाळूला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, यंदा पाणीसाठा चांगल उपलब्ध आहे. त्यामुळे खरिपाचे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातून निघेल अशी अपेक्षा आहे. मात्र आता ढगाळ वातावरण, रोगराई यामुळे पिकांना फटका बसणार असल्याची परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पिकांना मोठा फटका
यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहेत. विशेष म्हणजे अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. कापूस, सोयाबीन यासह फळ पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पिकांसह जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळं पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच रब्बीचे पीक बहरत असतानाच आता ढगाळ वातावरनामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Agriculture News: मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या करडई, तूर आणि सोयाबीनच्या वाणास राष्ट्रीय मान्यता