मोठी बातमी! मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
Aurangabad: पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
![मोठी बातमी! मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न maharashtra News Aurangabad News MNS officials attempt to break PFI office in Aurangabad मोठी बातमी! मनसे पदाधिकाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये PFI कार्यालय फोडण्याचा प्रयत्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/a27242c35a1beb2da4a98caaec8b5a4a166408657085789_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआयच्या सदस्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबादमध्ये मनसेने पीएफआयच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील पीएफआयच्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आज सकाळी शहरातील जिन्सी भागातील पीएफआय कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
एटीएसकडून औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेली पीएफआयचे पदाधिकारी आहे तरी कोण?
- एटीएसने बायजीपुरा भागातून परवेज खान मुजम्मील खान, (वय 26 वर्षे, रा.बायजीपुरा औरंगाबाद) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर परवेज खान पीओपीचे काम करत असल्याचे समोर आले. तसेच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या काही वर्षांपासून तो पीएफआय संघटनेचे काम करतो.
- एटीएसने किराडपुरा भागातून मौलाना इरफान मिल्ली (वय 37 वर्षे, रा. किराडपुरा औरंगाबाद) याला सुद्धा अटक केली आहे. तर इरफान मदरशामध्ये अरबी आणि उर्दूची शिकवणी घेतो आणि त्याला मौलाना म्हणून ओळखले जायचं.
- मेहमूद पुरा भागात राहणारा सय्यद फैजल सय्यद खलील (वय 28 वर्षे, रा. मेहमूद पुरा औरंगाबाद) याला सुद्धा एटीएस पथकाने अटक केली आहे. फैजलचे अत्तर विक्रीचे दुकान असून, मागील चार वर्षापासून तो पीएफआय या संघटनेत सक्रिय काम असल्याचे सुद्धा समोर आले आहे.
- तर एटीएसने शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी ( वय 37, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) याला सुद्धा अटक केली असून, तो पीएफआयचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)